आईची मांडी सर्व प्रश्नांची उत्तरे देते : शाम देशपांडे 

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
आई – वडील पाल्यांच्या आयुष्यात फार महत्वची भूमिका बजावत असतात. मी जेव्हा फार चिंताग्रस्त असतो तेव्हा -तेव्हा मी माझ्या आईजवळ जातो. आईच्या मांडीवर डोक ठेऊन शांत पडून राहतो. आईशी चर्चा करतो त्या क्षणी मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. आईची मांडी सर्व प्रश्नांची उत्तरे देते. आईच्या मांडीवर मला माझ्या जगण्याचा कॉन्फिडंन्स मिळतो. असे मत निवृत्त सनदी अधिकारी शाम देशपांडे यांनी व्यक्त केले.
जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम  यांच्या  रजत जयंती वर्षा  निमित्त समाजातील ८० जेष्ठ माता-पीता यांचा व समाजीक कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींचा मानवसेवा पुस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.
[amazon_link asins=’B079QTGHG3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6825d26b-a453-11e8-a85e-f9eb37058e2a’]
यावेळी मंचावर पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती,संजय चोरडिया,शरद शहा,विजयकांत कोठारी ,प्रवीण चोरबोले मांगीलाल कोठारी आदी मान्यवर उपस्थिती होते. मानवाच्या चांगल्या कर्मामुळे मानवाची घौडदौड सुरु आहे. जैन समाज नेहमी कर्मावर विश्वास ठेवतो त्यामुळे तो व्यवसायात यशस्वी होतो. असे मत प्रमुख पाहुणे   पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांनी व्यक्त केले. संचेती पुढे बोलताना म्हणाले जैन समाज नेहमी मदत करणे म्हणजे देणे आणि माफ करणे यावर विश्वास करतो जैन धर्माची ही शिकवण सर्व जगाने आत्मसात करायला हवी.
अंध, अपंग जैन साधू- साध्वी यांच्यासाठी सामाजिक कार्य केल्याबद्दल डॉ . सतीश जैन  या  बरोबरच कॅन्सर पिढीतांसाठी  सामजिक कार्य करणारे डॉ. रसिक शेठीया , आदेश खिंवसरा ,गौतम नाबिया ,कुंदन दर्डा ,भरत भुरट,विजय दुधेडिया ,यांना त्यांच्या सामजिक कार्यासाठी मानवसेवा पुस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. या प्रसंगी  जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम तर्फे रजत जयंती निमित्त  सामाजिक कार्य करणाच्या हेतूने  मानवसेवा फौंडेशनची स्थापना करण्यात आली .मानव सेवा फौंडेशनचे देखील उद्घाटन करण्यात आले. मानव सेवा फौंडेशन सामाजिक कार्यात मोठा सहभाग नोंदविणार आहे.
[amazon_link asins=’B07B6DM75J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6f42f527-a453-11e8-a972-79c876f2c041′]
केरळ पुरग्रस्तांनसाठी  1 लाख 11 हजार रुपयांची मदतः
केरळमधील पूरग्रस्तांनसाठी एक लाख अकरा हजार रुपयांची  मदत जाहीर करण्यात आली आहे . या प्रसंगी जैन सोशल ग्रुपच्या डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले. समीक्षा शिंगवी यांनी गणेश वंदना सादर केली . अनिल लुंकड यांनी स्वागतपर भाषण सादर केले. जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिमचे अध्यक्ष  रामलाल शिंगवी यांनी प्रस्तावना सादर केली. अजित खिंवसरा ,संजय शिंगवी, विजय छ्ल्लाणी , शांतीलाल पोखरणा ,किशोर गांधी , अनिल लुंकड ,प्रदीप गांधी , सतीश मुनोत आदी सभासदांनी  कार्यक्रमासाठी परिश्रम.घेतले या प्रसंगी जैन समाजातील अनेक मान्यवर मोठ्या उपस्थिती होते.