या बहाद्दराने भारतीयांना टाकले मागे : चक्क सू-सू करायला महामार्गावरच केलं विमान लँड 

पोलीसनामा ऑनलाइन – आपण भारतीय लोक रस्त्याने गाडी चालवतांना अथवा प्रवास करत असतांना अगदी सहज एखाद्याला लाघवी लागली तर गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन हलके होतो. असे आपण बऱ्याचदा पाहतो किंवा अनुभवतो तुमच्या सोबत देखील असा प्रकार कधी घडला असेल. पुरुषांना लघवी लागल्यानंतर ते ठिकाणाचा कोणताही विचार न करता.अगदी बिनधास्त गाडी बाजूला घेऊन सहज हलके होतात. याबाबतीत अमेरिकेतील एका बहाद्दराने तर भारतीयांना देखील मागे टाकले आहे. या व्यक्तीने चक्क लघवीसाठी त्याच विमानच लँड केलय. विमान लँडकरून अवलिया झुडपात गेला आणि सू-सू करू लागला.
विमान अचानक लँड झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी झाली असता त्यांनी त्याचा व्हिडीओ काढला जो की,सध्या सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. मीडियाच्या माहिती नुसार हा प्रकार अमेरिकेतील दक्षिण अलबामा राज्यात घडला आहे आणि हायवेवर लघवी करणारा व्यक्ती विद्यार्थी असून तो इन्स्ट्रक्टर जिम विलियम्ससोबत Cessna कंपनीचं छोटं विमान उडवत होता. त्यात अचानक बिघाड झाल्याने हे विमान काळजीपूर्वक त्याने खाली उतरवले आणि त्यांनतर तो लघवीला गेला. मात्र खुलासा देईपर्यंत उपस्थितांनी घटना कॅमेरात कैद करून याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केला आहे.