अंबरनाथमधील व्हर्टीव्ह कंपनीच्या जेवणातून कामगारांना विषबाधा

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन
कंपनीच्या जेवणातून कर्मचाºयांना विषबाधा झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली असून ४० ते ५० कामगारांना त्रास झाला आहे़ अंबरनाथ एमआयडीसीतल्या ‘व्हर्टीव्ह’ कंपनीत हा प्रकार घडला असून आठ कर्मचारी सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
[amazon_link asins=’B0085SLDKU,B071DF6BWQ,B00BSE5WQ4,B00MIFIKO8,B00MIFIYVM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’82bc55c2-b262-11e8-bd54-510335ea1f4d’]
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत ही कंपनी असून तिथे सुमारे ६०० कामगार काम करतात. या कामगारांना कंपनीच्या कँटीनमध्ये जेवण दिलं जातं. काल दुपारी कामगार जेवल्यानंतर अचानक त्यांना उलट्या, जुलाब आणि पोट दुखीचा त्रास सुरु झाला. जवळपास ४० ते ५० जणांना हा त्रास झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयांमध्ये नेण्यात आले़

 

पेट्रोल, डिझेलचा भडका, दर पुन्हा महागले

यापैकी काही कर्मचाºयांना उपचार करुन सोडून देण्यात आले असून आठ जणांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार अन्नातून झालेल्या विषबाधेचा असल्याचे संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले़ तर याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.