पुण्यातील सेवेनिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला नोकरानेच घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

उपरादरम्यान रुग्णालयात देखभाल करण्यासाठी नेमलेल्या नोकराने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या दहा बँक खात्यातून तब्बल १८ लाख १६ हजार ८२० रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर सेलच्या पथकाने नोकराला मुंबई येथून अटक केली आहे.

दिनेश गोविंद साळवी (वय २८, रा़ साईस्मृती सोसायटी, बोरीवली पश्चिम, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या नोकराचे नाव आहे.

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सोपान चौधरी (रा़ मगरपट्टा, हडपसर) हे रुग्णालयात उपचार घेत असाताना त्यांच्या देखभालीसाठी दिनेश साळवी याची नेमणूक करण्यात आली होती. चौधऱी यांच्यावर मुंबई व पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. चौधरी यांचे दादरच्या अॅक्सीस बँकेच्या शाखेत सॅलरी खाते आहे. या खात्यामध्ये सप्टेंबर २०१७ मध्ये भविष्य निर्वाह निधीचे २३ लाख रुपये जमा झाले होते़.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2eb62bf-7a1a-11e8-aaf6-6387f94f7307′]

तब्येत बरी झाल्यावर त्यांनी बँक खाते तपासल्यावर इंटरनेट बँकेद्वारे त्यांच्या खात्यातून २९ सप्टेंबर २०१७ ते ११ जून २०१८ या दरम्यान १८ लाख १६ हजार रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले़. त्यांनी तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधला़. त्यांच्या बँकेच्या माहितीचे व त्यास लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले़. त्यात चौधरी उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये देखभाल करण्यासाठी नेमलेल्या नोकराने त्यांच्या बँक खात्याच्या डेबीट कार्ड क्रमांक व पिन क्रमांकाचा वापर करुन इंटरनेट बँकींगच्या सहाय्याने वेळोवेळी रक्कम अन्य वेगवेगळ्या १० खात्यांवर वळविली. सायबर क्राईम सेलच्या पथकाने मुंबईहून दिनेश साळवी याला ताब्यात घेतले़. तपासात त्याने आपण मित्रांच्या १० बँक खात्यांमध्ये आॅनलाईन ट्रान्सफर केल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते, उपनिरीक्षक रुपाली पवार, पोलीस शिपाई नवनाथ जाधव, शितल वानखेडे यांनी ही कामगिरी केली़.