समाजाने आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा : सरपंच माऊली कांबळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी माझं जीवन एका सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे जीवन होते.मात्र त्या काळात समाजात वावरत असताना तृतीयपंथी म्हणून वेगळी वागणूक मिळत होती.गावची सरपंच झाल्यापासून चांगली वागणूक दिली जात आहे.मात्र अजून ही काही भागात तृतीयपंथींना वेगळी वागणूक दिली असल्याने समाजाचा आमच्याकडे बघण्याचा बदलावा असे आवाहन देशातील पहिल्या तृतीयपंथी सरपंच माऊली कांबळे यांनी केले.

बाबा ग्रुप ऑफ कंपनीस ,ऐन २४ इंटरटेन्मेन्ट यांच्या वतीने पुण्यात किन्नर सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,माजी नगरसेविका रुपाली पाटील,सागर बोदगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमा प्रसंगी रंजिताबाई नायक -तृतीयपंथी प्रमुख गुरु,चांदणी गोरे -एन .जी .ओ निर्भया आनंदी जीवन,नाली दळवी -सोशल वर्कर,पन्ना गुरु -वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांची शाळा चालवितात,माउली कांबळे सरपंच अकलूज,संचित पाटील -सोशल वर्कर,ऐश्वर्या बनसोडे -सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट,दिशा शेख -कवियत्री,रश्मी पुणेकर -पुणे महानगरपालिका कर्मचारी व आर्टिस्ट आणि प्रेरणा वाघेला -अध्यक्ष ह्युमन राईट्स व सोशल वर्कर या सर्व पुरस्कार्थीना सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे म्हणाले की,तृतीयपंथी व्यक्तींना समाजात अनेक अडीअडचणीना सामोरे जावे लागते.त्यातील आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाल्यावर पत्रव्यवहार करताना अडचणी येतात.त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून तृतीयपंथी आरोग्या विषयी सर्व सुविधा पुरविल्या जातील.असे यावेळी त्यांनी सांगितले.