सुनेचा खून करणाऱ्या सासू-सासऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

तीन मुली झाल्यामुळे वंशाला दिवा नाही, या कारणावरुन सुनेचा खून केल्याप्रकरणात सासु-सासऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.

सासरे सहादू शंकर केदारी (वय 75) आणि सासू अंजना (वय 65, रा. ताजे सज्जनवाडी, ता. मावळ) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पती यश उर्फ भाऊ सहादू केदारी (वय 34) याला अटक करण्यात आली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. मनिषा केदारी (वय 33) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचा भाऊ सुनील राम गोरे (वय 31, रा. हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी याबाबत कामशेत पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना 6 जुलै 2018 रोजी सकाळी साडेनऊ वाजता केदारी यांच्या घरात घडली होती.
[amazon_link asins=’B007E9HPLC,B00YEJYSEM,B007E9INFO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d4cc42b-b517-11e8-960d-95c1d626a010′]
लागोपाठ तीन मुली झाल्या. त्यामुळे वंशाला दिवा नाही. शेतात कामाला जात नसल्याने आणि ट्रॅक्‍टर घेण्यासाठी माहेरहूून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून कोयत्याने हातावर आणि डोक्‍यावर वार करून मनिषा यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सहादू आणि अंजना यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. अर्ज केलेल्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेले कपडे, गुन्ह्यातील कोयता जप्त करण्यात आला आहे. जामीन मिळाल्यास ते पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी दोघांचा जामीन फेटालळा, असा युक्तीवाद ऍड. सप्रे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा न्युज

पुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…

You might also like