महात्मा फुले यांना ‘भारत रत्न’ देण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारस 

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे शिफारस केली आहे. पद्म पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची तारीख नुकतीच संपली असून,  यासाठी ११ हजारांपेक्षा जास्त अर्ज केंद्राकडे आले आहेत. हे पुरस्कार गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित केले जातात.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5c2a09e-9a34-11e8-8dcf-e775f1ec3574′]

राज्य सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारत रत्न पुरस्कार थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मिळावा यासाठी शिफारस केली आहे. वरळीत ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. महात्मा फुले यांच्या १२५ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 2015 मध्येच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. तर सुप्रिया सुळे यांनी २०१८ साली लोकसभेत अशी मागणी केली होती. याबरोबरच अनेक ओबीसी संघटनांनी देखील अनेकवेळा भारत रत्न देण्याची मागणी केली होती.