बेरोजगार तरुण झाला कोट्याधीश

अलप्पुझा : वृत्तसंस्था

म्हणतात ना, नशीबात असेल तर ते नक्की मिळते. ते केरळच्या तोजो मैथ्यू या ३० वर्षाच्या तरुणाबाबत खरे ठरले आहे. एका रात्रीत तो कोट्याधीश झाला आहे. केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या तोजोला चक्क 1१३ कोटींची लॉटरी लागली आहे. कुट्टुनादमधला स्थानिक रहिवासी तोजो मैथ्यूने मित्रांच्या मदतीने लॉटरीचे तिकीट काढले होते. ज्याचा नंबर ०७५१७१ होता. तोजोने लॉटरीच्या माध्यमातून सात मिलियन दिरहम (यूएईची करन्सी) म्हणजे भारतीय चलनातील १३ कोटी १० लाख ४५ हजार १४४ रुपये जिंकले आहेत.

तोजो हा अबुधाबीमध्ये सिव्हिल सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्याने हल्लीच नोकरी सोडली होती. २४ जून रोजी भारत येण्याआधी त्याने अबूधाबीच्या एअरपोर्टवर लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तोजोला लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी  मित्रांनी मदत केली होती. तोजो रातोरात कोट्यवधी झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. तोजोची आई कुंजम्मा सांगते, मला तीन मुले आहे. त्यातील तिजो हा रिक्षाचालक आहे. तोजो आणि टिट्टो अबूधाबीमध्ये सिव्हिल सुपरवायझर आहेत. तिघांचे लग्न झाले आहे. तोजोचे पहिल्यापासून इथं एक घर बनवण्याचे स्वप्न होतं. परंतु त्याच्याजवळ पैसे नव्हते.

तोजोने या लॉटरीद्वारे १ लाख दिरहम जिंकले आहेत. तत्पूर्वी भारतीय वंशाच्या एका टॅक्सीचालकाने एप्रिलमध्ये अबूधाबीत लॉटरीच्या माध्यमातून १२  मिलियन दिरहम जिंकले होते.

जाहिरात