लग्नाच्या वाढदिवशीच व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ,जिल्ह्यातला उष्माघाताचा पहिला बळी

ADV

परळी: पोलीसनामा ऑनलाईन

जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असल्याची स्थिती असून जिल्ह्याचे तापमान हे 41-42 अंश सेल्सियस च्या पुढे पोचले आहे. या वाढत्या उन्हाने आज परळी येथील सराफा व्यापारी अजय रमेश सोनपेठकर (वय ३२) यांचा आज दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

अजय सोनपेठकर हे सराफा व्यापारी असून आज सकाळपासून त्यांची भर उन्हात खूप धावपळ होत होती. त्यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस असल्याने कामाच्या निमित्ताने ते बराच वेळ उन्हात काम करत होते. आज (शुक्रवारी) दुपारी १ च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना ताबडतोब परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोनपेठकर यांचा मृत्यू उष्माघातामुले झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. लग्न होऊन दोन वर्ष झालेल्या तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.