सावकारकीच्या जाचाला कंटाळून महिलेचा मंत्रालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न 

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू असतानाच, मंत्रालयासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अलकाबाई कारंडे असे महिलेचे नाव असून, सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्रसंगावधान राखत मंत्रालयाच्या गार्डन गेटवरील पोलिसांनी तात्काळ महिलेला ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
[amazon_link asins=’B014PHNO2Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c23429e6-8ff8-11e8-853c-39690910a455′]

प्राथमिक माहितीनुसार, अलकाबाई कारंडे या उस्मानाबाद जिल्ह्यामधील परंडा तालुक्यातील शिरगिरवाडी गावच्या रहिवाशी आहेत. त्यांनी सावकारकीच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते आहे.