अहमदनगर : सोमवारी महिला प्रबोधन मेळावा

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण विकास केंद्र जामखेड व कोरो मुंबई संचालित महिला समस्या निवारण केंद्र श्रीगोंदाच्या वतीने सोमवार दि. २५ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता बालाजी मंगल कार्यालय, बाजारतळ, श्रीगोंदा येथे निमित्त महिला प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामीण विकास केंद्राचे सचिव अ‍ॅड. अरुण जाधव यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला मंडळ फेडरेशन कोरो मुंबईच्या कार्याध्यक्ष मुमताज शेख यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होणार असून या कार्यक्रमास महिला मंडळ फेडरेशनच्या अध्यक्ष बिजुताई भोसले, सुजाता लवांडे, महिला व बालविकास अधिकारी रत्नमाला माने, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या अ‍ॅड. रंजना गवांदे, महिला दक्षता समितीच्या सदस्य अ‍ॅड. सुनीता पलिवाल, अ‍ॅड. विजया घोडके, लोकाधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अरुण जाधव, श्रोगोंदयाचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, प्रा. डॉ. बाळासाहेब बळे, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहळ, महिला जिल्हाध्यक्ष द्वारका पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

महिला समस्या निवारण केंद्राच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षांपासून स्त्री-पुरुष समानता, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, शासनाच्या विविध योजना, महिलांसाठी कायदेविषयक सल्ला केंद्र व साहाय्य केंद्र सुरू आहे. संस्थेने गेल्या ३ वर्षात संयुक्त घर मालकी अभियान, महिलांसाठी स्वतंत्र स्वछतागृहासाठी पाठपुरावा, ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, सामाजिक मान्यता बाबत जनजागृती करणे, भटके विमुक्त,  आदिवासी, पारधी समाजातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करणे, विधिसेवा समितीच्या मदतीने विधी साक्षरता अभियान राबविणे असे विविध अभियान राबविले आहेत. त्याचबरोबर महिलांची घरगुती हिंसा थांबविण्यासाठी संस्थेच्या वतीने श्रीगोंदा येथे समुपदेशन केंद्र चालविलेले जाते.

दि. २५ मार्च रोजी सकाळी १० वाजता श्रीगोंदा बसस्थानकापासून बालाजी मंगल कार्यालयापर्यंत महिलांची समता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये व महिला प्रबोधन मेळाव्यामध्ये महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन बापू ओहळ, द्वारका पवार, टीम लिडर प्रमोद काळे, समुपदेशक छाया रसाळ, जयश्री काळे, पल्लवी शेलार, ज्योती भोसले, छाया शिंदे, लता सावंत, छाया भोसले, सुनीता बनकर, लता सांगळे, काजोरी पवार, आसाराम काळे, शरद काळे, आशा चव्हाण, विलास काळे, उज्वला भावाळ, संतोष भोसले, मनीषा शिगण, साधना मोरे, संगीता मोढळे, जालिंदर शिंदे, मुमताज मुलाणी आदींनी केले आहे.