खासगी सावकाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – मुदल आणि त्याचे व्याज देण्यासाठी खासगी सावकाराने वारंवार लावलेला तगादा, तसेच दुचाकी घेऊन वैतागलेल्या २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मोशी येथे रविवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडला.

पवण जीवन केंद्रे (२२, रा. मोशी) याने आत्महत्या केली. तर सावकार मांडूबाब पालवे, गायबाई पालवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी जीवन किसन केंद्रे (४२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तर पालवे हे खासगी सावकार आहेत. केंद्रे यांनी पालवे याच्याकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याज मिळावे तसेच मुदल द्यावी यासाठी त्याने वारंवार तगादा लावला होता. तसेच पैसे न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी पालवे यानी दिली होती. केंद्रे यांचा मुलगा तिरुपती याची दुचाकी पालवे घेऊन गेला होता. पवण हा ती दुचाकी आणण्यासाठी आळंदीला गेला होता. मात्र पालवे याने दुचाकी दिली नाही. यामुळे वैतागून पवण याने राहते भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.