श्री स्वामी नारायण मंदिरात भक्तांचे मारले पाकिट

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – देवपूरातील श्री स्वामी नारायण मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा आटोपल्यावर दर्शनच्या वेळी परदेशी भक्ताचे खिशात ठेवलेले पाकिट चोरले.

देवपूरातील श्री स्वामी नारायण नूतन मंदिरात दोन ते चार दिवस मोठ्या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंहत, संत व परदेशातील, अन्य राज्यातील भक्तींनी धुळ्यातील मंदिर सोहळ्यात सहभागासाठी हजेरी लावली. देवपूरात मंदिर परिसरात दर्शनाच्या वेळी हरेश रमन पटेल यांना अज्ञात व्यक्तीने धक्का देत पँट मधील खिशातील पाकिटीवर हात साफ केला.

पाकिटात 30,000 हजार रोख ,122 युएएस अमेरीकी विदेशी चलन, विविध बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असा लाखोचा ऐवज चोरट्याने लंपास केला. चोरी प्रकरणी देवपूर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.