Pune : गुरूवार पेठेतील मंदिरातून दानपेटीची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मध्यवस्तीमधील मंदिरातून दानपेट्या आणि किमती ऐवज चोरून नेण्याचे प्रकार सुरूच असून, पुन्हा गुरुवार पेठ परिसरात असणाऱ्या आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या मंदिरातून चांदीचे कव्हर असणारी दानपेटी चोरून नेली. रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. तेजपाल मोतीलाल गोटीवाला (वय 51) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेत श्री आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे गोधीलवाडा मंदिरामधील श्री नाकोडा भैरवजैन मंदिर आहे. यादरम्यान चोरट्याने मंदिराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच 5 किलो वजनाची लाकडी पेटी आणि त्यावर चांदीचा पत्रा व रोख रक्कम 3 हजार असा एकूण 1 लाख 53 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. काल हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. अधिक तपास खडक पोलिस करत आहेत.