राजघराणे सोडण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता : प्रिन्स हॅरी

लंडन : वृत्तसंस्था – ब्रिटिश राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती या सन्मानाचा त्याग करताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. मात्र, राजघराणे सोडण्याशिवाय आमच्यासमोर अन्य पर्यायही नव्हता अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे राजघराणे बकिंगहॅम पॅलेसचे प्रिन्स हॅरी यांनी व्यक्त केली आहे. या राजघराण्यात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेगन मार्कल यांच्या हिज रॉयल हायनेस आणि हर रॉयल हायनेस या राजेशाही उपाध्या काढून घेण्यात आल्या. या करारावर रविवारी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर प्रिन्स हॅरी यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या

या घडामोडीनंतर ब्रिटन हेच माझे घर असले. माझा व मेगनचा विवाह झाला त्यावेळी आम्ही आनंदी आणि आशावादी होतो. अनेक वर्षे आम्ही अनेक आव्हानांचा सामना केला. राजघराण्यातून बाजूला होण्याचा हा निर्णय अचानक घेतलेला नसून विचार करून घेतला आहे. हा निर्णय आम्हा दोघांना अत्यंत दु:खदायक आहे. मात्र, त्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आम्ही तुमच्यापासून दूर जात आहोत असे समजू नका, असेही हॅरी यांनी म्हटले आहे.

ब्रिटनच्या राजघराण्यात जन्माला आलो हे माझे भाग्य आहे. ब्रिटनची राणी व या देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. यापुढेही ब्रिटनची राणी, राष्ट्रकुल व लष्कराची सेवा करण्याची इच्छा आहे. मात्र, निधीच्या पाठबळाशिवाय ते मी करू शकणार नाही, याची जाणीव असल्याचेही हॅरी यांनी स्पष्ट केले.

प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांच्याबाबत राजघराण्याने तयार केलेला एक्झिट करार हा वसंत ऋतूच्या आगमनापासून अंमलात येणार आहे. ब्रिटनमध्ये मार्चच्या अखेरीस हा ऋतू येतो. तोपर्यंत हॅरी यांना राजघराण्याशी संबंधित असणारी कर्तव्ये पार पाडावी लागणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –