‘सोशल डिस्टेन्सिंग’मध्ये ‘प्रेम’ अन् ‘रोमान्स’ देखील होणार, ‘या’ सिरीजमध्ये समजून घ्या संपूर्ण फंडा

पोलिसनामा ऑनलाइन –कोरोनामुळं जगभर वातावरण बदललं आहे. सोशल डिस्टेंसिंगमुळं सर्वांना असा प्रश्न पडला आहे की, आता प्रेम कस करणार. याशिवाय सिनेमात किसिंग किंवा इंटिमेट सीन कसे शुट केले जातील. आता एक अशी वेब सीरिज येणार आहे जी याच मुद्द्यावर भाष्य करते. ही सीरिज सांगते की, कोरोनाच्या काळातही प्रेम कायम राहणार आहे.

कशी आहे लव इन द टाईम ऑफ कोरोना सीरिज ?

लव इन द टाईम ही एक रोमँटीक कॉमेडी सीरिज आहे. याचे 4 पार्ट असणार आहेत. कोरोनाच्या काळात कसं प्रेम करावं यावर सारा भर आहे. यातील थीम युनिक आहे. खास बात अशी की, यातील प्रत्येक अॅक्टरनं घरीच शुटींग केली आहे. यात दाखवलं आहे की, काहीही झालं तरी प्रेम करणं सोडणार नाही. प्रेमासाठी माणूस काय करतो हे यात दाखवण्यात आलं आहे. कोणी आपल्या रुममेटसोबत रिलेशन बनवत आहे तर कोणी आपल्या एक्स सोबत पुन्हा सेट होत आहे अस सगळं यात आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही घेतलेला प्रत्येक अनुभव तुम्हाला पहायाल मिळणार आहे.

लव इन टाईम ऑफ कोरोना ही सीरिज ऑगस्टमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. महामारीच्या काळातील ही पहिली रोमँटीक कॉमेडी सीरिज असेल असं सांगितलं जात आहे.