‘वंचित’ची मदार असलेल्या दलित मतांचा विधानसभा निवडणूकीत ‘बसपा’ला फायदा ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर आता विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली असून त्यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबरोबर जाण्याचा त्यांचा कोणताही मानस नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे आता आघाडीसमोर मोठी अडचण उभी राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सध्या राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या मागे असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यामागे हि जनता असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बसपा अध्यक्ष मायावती यांना मानणारा देखील एक वेगळा गट महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मायावती यांचादेखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व २८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वंचितला याचा फटका नक्कीच बसणार आहे. राज्यातील दलित, मुस्लीम आणि इतर उपेक्षीत समाजघटक आणि हिंदी भाषिकांचा आधार म्हणून बसपा राज्यात निवडणूक लढवणार आहे. दलित मते आपल्याकडे वळवण्यासाठी बसपाने आतापासूनच प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी वंचितला हि लढाई अवघड जाण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील जवळपास १५ टक्के अनुसूचित जातीची मते आपल्याकडे वळवण्यासाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

दरम्यान, एमआयएमच्या रूपाने वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम मते आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले होते. त्याचा मोठा फायदा देखील त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला होता. त्यामुळे यावेळी मुस्लिमांची मते स्वतःकडे वळविण्याचे मोठे आव्हान यावेळी बसपापुढे असणार आहे. त्याचबरोबर मुस्लिम उमेदवार नसलेल्या मतदारसंघातील मते मिळवण्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –