…म्हणून सोन्यातील गुंतवणूक यंदा खुप फायदेशीर ठरणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वी लग्न समारंभावेळी सोन्याची खरेदी व्हायची, पण आता सर्वसामान्य ग्राहकही सोन्यात पद्धतशीर गुंतवणूक करु लागला आहे. अमेरिका-इराणमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे सोन्यावर याचा परिणाम होण्याची शक्याता आहे. अमेरिकेमध्ये असलेल्या मुख्य बँका आणि सरकार यांच्यातील तणावामुळे या ठिकाणचे लोक सोन्यात गुंतवणुक करत आहेत. त्यामुळे यांदाच्या वर्षी सोने महागण्याची शक्याता असून सोन्याचे भाव येत्या वर्षात आत्तापर्य़ंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

अमेरीकन बँकांनी सोन्यावरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या भावावर पडणार आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा भावाने ३४ हजारांच्या पुढे गेला आहे. असाच भाव वाढत राहिला तर ऑक्टोंबर पर्यंत सोन्याचा भाव ३८ हजारांपर्यंत जाण्याची शक्यात आहे.

२००० हजार सालानंतर पहिल्यांदाच सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सोने १४२४ ते १४२५ डॉलर प्रति औंसवर ट्रेड होत आहे. पण सोन १५०० डॉलरच्या वर जाण्याची शक्यात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचा सरळ परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार असल्याचे आयबीजेएचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी म्हटले आहे.