कामाची गोष्ट ! तापमानासह शारीरीक अंतराबाबत सावध करतं ‘फेब्रिआय’, शहराचे सर्व्हिलन्स करते ‘कोविड अनालिटिक्स’, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोविड-19 च्या विरोधातील लढाईत स्टार्ट अप्सची भूमिका महत्वाची राहीली आहे, ज्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सोल्युशन दिले आहेत. नोएडा येथील वेहांत टेक्नोलॉजीजच्या कपिल बर्डेजा आणि त्यांच्या टीमने सुद्धा थर्मल स्क्रीनिंग सिस्टम (कॅमेरा) ‘फेब्रिआय‘ डेव्हलप केला आहे, जो विविध सरकारी आणि खासगी संस्था, ठिकाणांवर लावण्यात आला आहे…

कपिल यांच्या माहितीनुसार, फेब्रिआय एक थर्मल स्क्रीनिंग सिस्टम आहे, ज्याद्वारे कोणतीही सरकारी बिल्डिंग, खासगी कॉम्प्लेक्स, आयटी पार्क, हॉटेल, एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, धार्मिक स्थळे इत्यादीमध्ये प्रवेश करणार्‍या लोकांचे तापमान नोंद केले जाते. याशिवाय, एआय आधारीत एल्गोरिदमद्वारे माहिती घेतली जाते की, अमुक एक व्यक्तीने फेसमास्क घातला आहे किंवा नाही. हे लोकांमधील शारीरीक अंतराचीही माहिती देते. जर काही गडबड असेल, तर कॅमेरा अधारित याच्या सिस्टममधून अलार्म वाजू लागतो.

याशिवाय, यांनी ‘कोविड अनालिटिक्स’ नावाचे एक प्रॉडक्स लाँच केले आहे, जे शहराचे सर्व्हिलान्स करते. सध्या सेंटल रेल्वे आणि नॉर्थ फ्रंटियर रेल्वेमध्ये हे स्थापन करण्यात आले आहे. देशाच्या वेगवेगळ्या शहरात हे स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तसेच या सिस्टममध्ये फेस रेकाग्निशन मॉड्यूल जोडण्याचेही काम सुरू आहे.

स्वदेशी इनोव्हेशनवर आहे जोर
कपिल यांनी आयआयटी दिल्लीमधून पोस्ट ग्रॅजुएशन केल्यानंतर मॅकेंजी अ‍ॅण्ड कंपनी आणि अव्हेंटिस सारख्या कंपन्यांसोबत यशस्वी काम केले आहे. यानंतर उद्योगात पाऊल टाकले आणि सहकार्‍यांच्या मदतीने अनेक टेक्नोलॉजी स्टार्ट अप स्थापन केले.

ते सांगतात की, 2005 मध्ये आयआयटी दिल्लीच्या इन्क्यूबेटरमध्ये कम्प्यूटर सायन्सेस आणि इंजिनियरिंग डिपार्टमेंटच्या 5 प्रोफेसर्सच्या मदतीने मी आणि अनूप जी प्रभु यांनी वेहांत टेक्नॉलॉजीजची सुरूवात केली. उद्देश एकच होता, सिक्युरिटी आणि सर्व्हिलान्ससाठी देशातच कम्प्युटर व्हिजन अ‍ॅण्ड इमेज प्रोसेसिंगवर उपाय डेव्हलप करणे. त्यानंतर आम्ही ‘अंडर व्हेकल स्कॅनिंग सिस्टम’ ची निर्मिती करण्यास सुरू केली, जी परदेशातून आयात केली जात होती. अशाप्रकारे, मागच्या नऊ वर्षात त्यांनी भारताशिवाय 12 अन्य देशांत सुमारे 800 युनिट्स इन्स्टॉल किंवा त्याची पूर्तता केली आहे. कंपनीने एआय आधारित ऑटोमेटड नंबर प्लेट रिडिंग सिस्टम सुद्धा डेव्हलप केली आहे, जी ‘ट्रॅफिकमॅन’ (ट्रॅफिक इन्फोर्समेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट सिस्टम) च्या नावाने ओळखली जाते. ही सिस्टम देशातील 25 शहरात स्थापन केली गेली आहे. याशिवाय, 2015 मध्ये त्यांनी एक्सरे बॅगेज स्कॅनर्ससुद्धा विकसित केले आणि विमान तळावर त्याची पूर्तता केली.

सुरक्षित भविष्याची निर्मिती आहे व्हिजन
वेहांत टेक्नॉलॉजीजचे सीईओ कपिल बर्डेजा यांनी यांनी सांगितले की, आयआयटी दिल्ली इन्क्युबेटरने संस्थांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रयोग करण्यात मदत केली तसेच संस्थापक प्रोफेसर्सकडून सतत विचारविनिमय करण्याची संधी दिली. यातून आम्ही आमच्या आयडीया तातडीने इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टमध्ये डेव्हलप करण्यात यशस्वी झालो. तेथील इकोसिस्टममुळे आम्हाला सेल्स आणि मार्केटिंगमध्ये सुद्धा सहकार्य मिळाले.

परंतु, सध्या स्टार्ट अप्ससाठी अतिशय खडतर काळ सुरू आहे. कंपन्यांच्या रेव्हेन्यूवर खुप वाईट परिणाम झाला आहे. अनेक एंटरप्रेन्योर्सने कायमचे किंवा तात्पुरते ऑपरेशन थांबवले आहे. परंतु, आम्ही तात्काळ निर्णय घेऊन नव्या इनोव्हेशन्सद्वारे कंपन्या आणि सरकारी संस्थांसाठी नव्या स्थितीचा सामना करण्यासाठी तयार केले. कोविड प्रिव्हेंशन आणि डिटेक्शनशी संबंधित नवे प्रॉडक्ट डेव्हलप करून आम्ही रेव्हेन्यूची भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे व्हिजन हे टेक्नॉलॉजीद्वारे सुरक्षित भविष्य निर्माण करण्याचे आहे.