जाणून घ्या केसगळतीची ‘ही’ प्रमुख कारणं, त्यावर करा ‘हे’ उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – रोज होणाऱ्या केसगळतीने महिला असो व पुरुष चिंतेत असतात. कारण केसांवर प्रत्येकाचा लूक अवलंबून असतो. सगळेच लोक केसगळती रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरत असतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, केस केवळ विशेष काळजी न घेतल्यानेच गळत नाही तर काही आजार सुद्धा याला कारणीभूत असतात.

आपल्या डोक्यावर असलेल्या १ लाख केसांपैकी ५० ते १०० केसांची दररोज गळती होत असेल तर ती स्थिती घाबरण्याची नाही, असे अमेरिकन असोसिएशन ऑफ डर्मटोलॉजिस्टचे मत आहे. डोक्याचे केस गळणं किंवा अकाली टक्कल पडणं हे बरचसं आनुवंशिक असते. पण अलीकडे अगदी तिशी चाळीशी मध्येच टक्कल पडणे, खूप केस गळणे, पातळ होणे हे अकाली वार्धक्याचंही लक्षण असू शकते. तसेच बीपी साठी औषधें, हाय युरिक ऍसिड औषध घेण्याचे प्रमाण सुद्धा वाढलं आहे. या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून देखील केस गळू शकतात. मुख्यत्वे स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, पिंपल्स साठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील हाय व्हिटॅमिन ए हे सुद्धा केस गळतीचे कारण असू शकते.

मोठ्या आजारपणानंतर अचानक केस गळती सुरु होऊ शकते. कुठलाही क्रॉनिक स्ट्रेस अथवा मानसिक धक्का हे अचानक केस गळतीचे कारण ठरतं. हिमोग्लोबिनची कमतरता, आहारातील प्रोटीनचे कमी प्रमाण, थायरॉईड हार्मोन्सची कमी किंवा जास्त प्रमाण असेल तर, त्याने केस गळतात विरळ होतात. डोक्याला झालेल्या फंगल इन्फेक्शनमुळे केसांची गळती वाढते.

केमिकलयुक्त शॅम्पू औषधांच्या दुकानात सर्रास उपलब्ध असतात. पण खूप जास्त त्रास असेल तर मात्र त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कॅल्शिअम, मॅग्नेशियम, बायोटिन, झिंक, व्हिटॅमिन बी 12 ही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. आयर्नच्या कमतरतेमुळे कमी होणारे हिमोग्लोबिन केसांचे पुरेसे पोषण करत नाही. भारतामध्ये हे एक केस गळण्याचं मुख्य कारण आहे.

आहारात हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि प्रोटिन्स असलेला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. केस किती गळणार, टक्कल किती पडणार हे जरी काही नाही अनुवंशिकता ठरवत असेल तरी आपणही काही गोष्टी न केल्यामुळे ही समस्या आपल्यावर ओढवून घेत असतो. त्यासाठी पोषक आहाराने शरीराची काळजी घेणे आणि मेडिटेशन/योग करुन मनाची काळजी घेणे हे केसाचं आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे ठरु शकते.

केसांच्या काळजी घेण्यासाठी काही पथ्य

१. जोरात विचारल्याने केसांच्या मुळांना दुखापत होते.
२. केसांना खूप शॅम्पू लावणे टाळावे.
३. हेसर स्प्रे, हेअर ड्रायर यांचा वापर कमीत कमी करणे.
४. केस ओले असताना खसखसून पुसू नये.
५. केसांना रंग लावणे हानिकारक
६. केस खूप घट्ट बांधल्याने केसांवर ताण येतो.