सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘ही’ आठ कागदपत्रे महत्वाची

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण मंजूर केले आहे. हे आरक्षण लोकसभा आणि राज्यसभेत देखील मंजूर करण्यात आले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?

पॅन कार्ड
आयकर भारण्यासाठी तसेच तुमच्या महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक म्हणजे पॅन कार्ड. आजच्या काळात नोकरी आणि इतर क्षेत्रात देखील पॅन कार्ड महत्वाचे ठरते. सवर्ण आरक्षण मिळवण्यासाठी देखील पॅन कार्ड महत्वाचा पुरावा ठरेल.

उत्पन्नाचा दाखला
सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मानले जाते. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला असणे महत्वाचे आहे. सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ८लाखापेक्षा कमी उत्पन्नअसलेला उत्पन्नाचा दाखला सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी महत्वाचा आहे.

आधार कार्ड
सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्वाचे आहे. तुम्ही भारतीय असल्याचा हा महत्वाचा पुरावा आहे. त्यामुळे आधार कार्ड महत्वाचे कागदपत्र आहे. या कार्डवरून तुमची संपूर्ण माहिती समजते त्यामुळे आधारकार्ड महत्वाचे आहे.

जनधन योजनेचे बँक खाते
सवर्ण आरक्षणाचा लाभ नोकरी आणि शिक्षणासाठी घ्यायचा असल्यास तुमचे सरकारच्या जन धन योजने अंतर्गत बँक खाते असणे महत्वाचे आहे. या योजने अंतर्गत त्यांनाच लाभ दिला जातो जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत.

बँक पासबुक कॉपी
या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या चालू बँक खात्याचे पासबुक आवश्य जवळ ठेवा. या बसबुक मध्ये तुमच्या तीन महिन्याच्या खात्यावरील आवाक-जावक छपाई असणे महत्वाचे आहे.

इनकम टैक्‍स रिटर्न
सवर्ण आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या इनकम टैक्‍स रिटर्न चा कागद तुमच्या जवळ ठेवा. यातील फॉर्म १६ या गोष्टीचा पुरावा आहे की, तुमचे वार्षिक उत्पन्न ८ लाख पेक्षा कमी आहे, आणि तुम्ही या आरक्षणाच्या कक्षेत येता.

दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिका

सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे शिधापत्रिका महत्वाचे कागदपत्र ठरते. कारण यावरून आर्थिक दुर्बल घटक असल्याचे समजते. त्यामुळे हे महत्वाचे कागदपत्र ठरते.

जात प्रमाणपत्र

सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र महत्वाचे आहे.

सवर्ण आरक्षणाचा फायदा कुणाला?

–सरकारच्या दाव्यानुसार ब्राह्मण, बनिया, ख्रिश्चन, मुस्लिम अशा सगळ्या समाजाला १० टक्के आरक्षणाचा फायदा होईल

–ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांना नोकरीत १० टक्के आरक्षण लागू होईल

–ज्या कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांनाही या आरक्षणाचा लाभ मिळेल

–ज्या कुटुंबाकडे १ हजार स्क्वेअर फूटापेक्षा कमी क्षेत्रफळाचं घर आहे, तेसुद्धा आरक्षणासाठी पात्र असतील.