Coronavirus : करू नका ‘या’ 6 चुका, अन्यथा कमी होईल ‘रोगप्रतिकारकशक्ती’, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –    सरकारकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. उलट रोजच्या रोज नवे रूग्ण सापडण्याचा विक्रम होत आहे. अशावेळी लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर कोरोनाला दूर ठेवण्यात मदत होऊ शकते. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी जसे आहारात काही बदल करावे लागतात, तसेच काही चुकाही टाळल्या पाहिजेत. या चुका कोणत्या, याविषयी माहिती घेवूयात.

अशी घ्या काळजी

1 मीठ

आहारात जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने ब्लॉकेजेसमुळे होणारे हृदयविकार होतात. रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजेसमुळे हृदयाला रक्तपुरवठा होत नाही आणि हार्ट अटॅक येतो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते. यासाठी आहारात मिठ कमी करून हा धोका टाळा.

2 कोल्ड्रींक्स

कोल्ड्रींक्समुळे पचनक्रिया मंदावते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. यातून विविध आजार उद्भवतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यापासून दूर राहा.

3 प्रोसेस्ड् फुड

याचे जास्त सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. कारण यात कोणतेही पोषक घटक नसतात.

4 कॅफिन

चहा किंवा कॉफीचे प्रमाण खुपच कमी करा, किंवा सोडून द्या. शक्य नसल्यास दिवसातून एकदा किंवा दोनदाच प्या. अशा कॅफिनयुक्त पेयामुळे अ‍ॅसिडीटी, छातीत जळजळ अशा समस्या होतात.

5 मादक पदार्थ

मादक पदार्थांच्या अतिसेवनाने रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. किडन्या खराब होतात. यासाठी मादक पदार्थांपासून दूर राहा.

6 शिळे अन्न

शिळे अन्न खाणे टाळा. पावसाळ्याच्या दिवसात यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो.