Corona च्या संकटात जगताहेत ‘हे’ लोक; ‘या’ यादीमध्ये तुमचा तर समावेश नाही ना? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरस साथीचा रोग झपाट्याने पसरला आहे. ही महामारी आजपर्यंत पोहोचली नाही असे चुकूनच एखादे शहर वाचले असेल. अशातच लोकांना जागरूक करण्यासाठी केंद्र सरकारने एक यादी प्रसिद्ध केली आहे. या रोगात कोणत्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते आणि ते कसे टाळावे हे यादीमध्ये सांगण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले ट्विट

केंद्र सरकारच्या IndiaFightsCorona ट्विटर अकाउंटवर ही यादी जाहीर केली आहे. सरकारचे म्हणणे आहे की याचा उद्देश लोकांना कोरोना साथीच्या रोगाबद्दल जागरूक करणे हा आहे.

या ट्विटमध्ये असे सांगितले गेले आहे की धूम्रपान, हृदयविकार आणि श्वसन रोग असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका असू शकतो.

आपण कुठे आहेत या यादीमध्ये?

१)  केंद्रीय आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या मते, ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थिती त्यांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

२)  मंत्रालयाच्या मते, जे लोक बिडी, सिगारेट, हुक्का, गुटका किंवा इतर कोणत्याही प्रकारचा नशा करतात. त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

३)  ज्यांना हृदय रोग, कॅन्सर, डायबिटीज आणि दमा यांसारखे आजार आहेत. त्यांच्यातही कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. या आजारांमुळे संसर्ग होण्याचा धोका ३-४ पट जास्त वाढतो.

४)  जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुमच्या साखरेची पातळी जास्त असेल तर तुम्हाला कोरोना होण्याची अधिक शक्यता दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत तीन पट जास्त असेल.