पूजा हेगडेच्या ‘या’ व्हिडीओमुळे चाहते पागल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोहेंजोदडो या 2016 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री पूजा हेगडेच्या हॉटनेसचे अनेकजण दीवाने आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की, या सिनेमात पूजा ग्रीक गॉड हृतिक रोशन सोबत झळकली होती. परंतु हा सिनेमा म्हणावा तितका हिट झाला नाही हेही खरे. परंतु या सिनेमातील क्युट आणि सेक्सी पूजा प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

https://www.instagram.com/p/Bxyj-5wHgsr/?utm_source=ig_embed

सध्या पूजा हेगडे तिच्या काही सिनेमांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिचा सेक्सी व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तिचा क्युट आणि हॉट अंदाज दिसत आहे. तिच्या सेक्सी अदांवर तु्म्हीही फिदा व्हाल. पूजाच्या या व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आल्याचे दिसत आहे. पूजा हेगडेचा हा सिनेमा अर्जुन कपूरचा सिनेमा इंडियाज मोस्ट वॉन्टेड या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगमधील आहे जिथे त्यांच्याव्यतिरीक्त अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पूजा हा सुंदर लुक खूपच वेगळा आणि खास दिसत आहे. तिचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना वारंवार हा व्हिडीओ पाहण्यास भाग पाडताना दिसत आहे.

पूजाने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा जंप सूट घातला होता ज्यात ती हॉट दिसत होती. या सुंदर ड्रेसमध्ये ती खूपच वेगळी दिसत होती. मोकळे केस आणि ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पूजा खूपच हॉट दिसत होती. पूजाने या ड्रेससोबतच सिंपल आणि न्यूड मेकअप केला आहे. सोबतच तिने हाय हिल्स कॅरी केल्याचे दिसून आले. चाहत्यांना पूजा हा व्हिडीओ इतका आवडला आहे की, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.