थेऊर : कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढत असल्याने चिंतेचे वातावरण

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – येथील कोरोना परिस्थिती गंभीर असून या गावातील मृत्यू दर वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंत पाच रुग्ण कोरोनामुळे मृत्यु पावले आहेत.

थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असून गावची लोकसंख्या दहा हजारांच्या आसपास आहे येथे गावठाणासह अनेक वाड्यावस्त्या पण आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात आली असली तरीही रुग्णाची संख्या दररोज वाढत आहे आजपर्यंत एकुण 62 रुग्ण आढळले त्यातील 37 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर 20 रुग्णांवर वेगवेगळ्या हाॅस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. परंतु चिंतेची बाब म्हणजे येथील संक्रमीत रुग्णाचा मृत्युदर वाढत आहे काल शुक्रवारी रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला त्यामुळे कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या रुग्णाची संख्या 5 वर पोहोचली आहे.

गावात आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि शालेय शिक्षक यांच्या माध्यमातून दररोज सर्वेक्षण चालू असताना रुग्णाची माहिती समोर येण्यास खुप उशीर लागत आहे याचे कारण स्थानिक नागरीक प्राथमिक लक्षणे असली तरीही लपवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे परिणामी जेंव्हा एखादा रुग्ण आढळून येतो तेंव्हा परिस्थिती गंभीर झालेली असते अशा रुग्णाला वेळेवर सर्व सुविधा मिळण्यास उशीर होतो.

यावर कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी स्थानिक नागरिकांना सूचित केले आहे की, आपण आरोग्य विभागाला सहकार्य करावे लवकरात लवकर रुग्णाची माहिती कळवा उपचार चालू करा आणि आपले आरोग्य सांभाळा.