‘त्या’ मधमाशीने घरट्यातच दिला पिलांना जन्म

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन
मधमाशी एखाद्याने तिचे पोळं उठवल्यानंतर ती हल्ला करते. आपल्या नजरेत अशीच तिची ओळख आहे. पण या पलीकडे जाऊन तिच्या मातृत्वाचा दाखला देणारे व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखा फिरत आहे.

पुण्याच्या खेड येथील एका घराच्या दारातील बिळात मधमाशीच्या मातृत्वाचा दाखला देणारे दृश्य एका कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हिरव्या पानांपासून गुलाबाच्या फुलासारखे घरटे बनवण्यात ही मधमाशी गुंग आहे. कुणाचीही मदत न घेता तिने हे घरटे अवघ्या काही मिनिटांत साकारले आहे. या सुरेख अन सुरक्षित घरट्यात ती अंडी देऊन पिल्लांना जन्म देते. भर उन्हात स्वतःसह पोटच्या पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी ही आई कशा प्रकारे झटत आहे हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. “लीफकटिंग बी” असे या मधमाशीचे नाव असून ती या परिसरात दुर्मिळ आहे. मात्र आज या दुर्मिळ मधमाशीने तिच्या मातृत्वाची जणू तिने साक्षच दिली. असा हा सुंदर व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे.