सोनसाखळी, केबल चोरणारे डेक्कन पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी आणि सरकारी केबल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करुन दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई डेक्कन पोलिसांनी नुकतीच केली.

काही दिवसांपूर्वी डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना तीन महिला संशयित रित्या जाताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या केबलची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मेनगेट समोरील बीएसएनएल कंपनीची केबल कापून चोरुन घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी तीन महिलांना अटक करुन ५५ हजार रुपयांची सरकारी केबल जप्त केली. ही कारवाई पोलीस उप निरीक्षक एस.के. सोनवणे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई तरंगे, महिला पोलीस नाईक ढवळे, शेख यांनी केली.
[amazon_link asins=’B005FYNT3G,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce19c76c-b505-11e8-8fa3-b32ddcf2f1b1′]

अलंकार पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या समीर हज्जु पठाण, राहुल गजेंद्र कांबळे यांना न्यायालयाकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान दोघांनी डक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सोनसाखळीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस हवालदार शिंदे, पांचाळ, गुजर, तरंगे, बडगे, ननावरे यांनी केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा न्युज
पुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…
https://t.me/policenamanews