या कारणामुळे लोक विवाहानंतर हि ठेवतात विवाह बाह्य प्रेम संबंध 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बदलाच्या जीवन शैलीत आणि स्पर्धेच्या धबडग्यात हि लोकांना रिलेशन मध्ये राहणे आवडते. कारण लोकांच्या  शरीराची महत्वाची निकड म्हणजे सेक्स आहे. विवाहित जीवनात हि माणसाची सेक्सची गरज भागली नाही कि माणसे विवाह बाह्य प्रेम संबंध ठेवतात. लोक विवाह बाह्य संबंध का ठेवतात अशा विवाह बाह्य संबंध ठेवण्याच्या कारणांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

लग्नाआधीचा भूतकाळ

लग्नाच्या अगोदर कोणाचे तरी कोणावर प्रेम असतेच असते. काही  कारणामुळे आपण आपल्या प्रियसी व प्रियकरा सोबत विवाह करू शकत नाही अशा वेळी ती दोन माणसे आपल्या प्रिय लग्नाआधीच्या जोडीदाराला गुप्तपणे भेटून आपसात सुख दुःख वाटत असतात. तसेच त्या दोन युगुलांची लग्ना अगोदर पासून जर सेक्सशुल अट्याचमेंट झालेली असेल तर ती वीण लग्नच काय अन्य कोणत्याही बंधनाने उसवू शकत नाही.  म्हणून विवाहित स्त्री किंवा पुरुष यांच्या आयुष्याच्या भूतकाळात काय घडले आहे हे विवाह बाह्य संबंधनां ठोस कारण होऊ शकते.

वैवाहिक जीवन सुखी नसणे    
निसर्ग सगळ्यांना एक सारखे बनवत नाही त्यामुळे काही वैवाहिक जोडप्यांमध्ये सेक्सशुल प्रॉब्लेम असतात त्याचे पर्यावसन विवाह बाह्य प्रेम संबंधात होते. यात ते संबंध ठेवण्याऱ्या लोकांना दोषी मानता येत नाही. कारण माणसाच्या आयुष्यात सेक्स नावाची पण एक भूक असते हि गोष्ट आपण मानली पाहिजे. त्यामुळे विवाह बाह्य संबंधांना कोणीही रोखू शकत नाही. म्हणून यातून होणाऱ्या विघातक कृतींना रोखणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

मानसिक एकटेपण 
माणूस हा समाजशील प्राणि आहे त्याच्या आयुष्यातील  बाब म्हणजे त्याला कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता असते. म्हणूनच माणसाने एकटेपणाला घालवण्यासाठी बऱ्याच वेळा विवाहबाह्य संबंध जोडल्याचे आपणास पाहण्यास मिळते. तर वैवाहिक जोडीदार आपल्या पासून दूर राहत असल्यास संभोगाचे विचार मनात येऊन सुद्धा वैवाहिक व्यक्ति विवाह बाह्य संबंधांकडे वळू शकतो.

शारीरिक आवश्यकता 
माणसाला शरीराला सुख आवश्यक असते . माणसाला एकाद्या आजाराने ग्रासलेले असेल तर माणूस खंगत जातो. त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वाथ्य बिघडते. त्याच प्रमाणे मानवी शरीराला सेक्सची आवश्यकता असते. सेक्सच्या आवश्यकतेची पूर्तता झाली नाही कि माणसे विवाह बाह्य संबंधांकडे वळतात.