या वर्षी अ‍ॅपलचे ३ नवे सुपर iPhone येणार

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – अ‍ॅपल या वर्षी तीन नवीन आयफोन ( iPhone) लाँच करणार आहे. एका आयफोनमध्ये तीन कॅमेरे असणार आहेत. तर एक iPhone लो कॉस्ट एलसीडी मॉडेलवाला असणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात हे वृत्त स्पष्ट झाले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये आलेल्या माहितीनुसार आयफोन एक्सआर ची विक्री कमी झाल्याने अ‍ॅपल एक नवा एलसीडी आयफोन आणि २ प्रिमिअम मॉडेल्स सादर करणार आहे. हे दोन्ही प्रिमिअम मॉडेल आयफोन एक्सएसची पुढील आवृत्ती असणार आहे.
 तीन कॅमेरा सेटअप 
आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठी टक्कर देण्यासाठी अॅपल आपल्या प्रमिअम मॉडेलमध्ये आपला पहिला तीन कॅमेरा सेटअप असलेला फोन आणण्याच्या तयारीत आहे. नवीन आयफोन, आयफोन एक्सएसमॅक्सची जागा घेईल. तर आयफोन एक्सआर आणि आयफोन एक्सएसच्या सक्सेसरमध्ये ड्युअल रिअर कॅमेरे असतील. म्हणजेच या नव्या आयफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे असतील. त्याशिवाय, नवीन एलसीडी आयफोनची सुधारित आवृत्ती येण्याची शक्यता आहे.
२०२०मध्ये अ‍ॅपल एलसीडी आयफोन आणणार नाही 
अहवालात सांगितल्याप्रमाणे अ‍ॅपल २०२० मध्ये एलसीडी पर्यायाला रामराम करणार आहे. म्हणजेच कंपनी २०२०मध्ये एलसीडी आयफोन आणणार नाही. २०२०मध्ये OLED-Only आयफोन आणणार आहे. याचे कारण ओएलईडी तंत्रज्ञान अधिक चांगल्या प्रकारे कॉन्ट्रास्ट आणि कलर रिप्रोडक्शन करते. एका दुसऱ्या अहवालात सांगितल्याप्रमाणे अ‍ॅपल आपल्या कॅमेरा प्रणालीमध्ये लाँग डिस्टन्स टाइम ऑफ फ्लाइट (ToF) तंत्रज्ञान सुधारणा करण्यासाठी काम करत आहे. या फीचरचा वापर सुरक्षा, गेमिंग आणि एग्युमेंटेड रियल्टी अ‍ॅप्लिकेशन्समध्ये करता येणार आहे. OnLeaksनुसार नवीन येणाऱ्या आयफोनचे नाव आयफोन XI असेल, नवीन आयफोन इंजिनिअरिंग व्हॅलिडेशन टेस्ट स्टेजला आहे.