चलन भरण्यास सांगणाऱ्या पोलिसाला शिवीगाळ करत धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

भरधाव वेगाने चारचाकी चालवणाऱ्यास थांबवून सिट बेल्ट लावला नसल्याने तसेच , गाडीच्या काचांना काळ्या फिल्म लावल्याने नियमाचे उल्लंघन झाले म्हणून दंडाचे चलन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून कारचालक तरुणाने पोलिस कर्मचार्‍यावर हात उगारला. तसेच त्यांना धमकीही दिली. याप्रकरणी तरुणावर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश गजेंद्र गागडे (वय 27, केळेवाडी, कोथरुड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निखिल कुर्हे (वाहतूक पोलिस कर्मचारी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखील कुर्‍हे हे कोथरुड वाहतुक विभागात पोलिस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोथरुड वाहतुक विभागासमोरील सार्वजनिक रस्त्यावर कर्तव्य बजावत होते उभे होते. त्यावेळी आकाश गागडे हा त्याची कार सीट बेल्ट न लावता भरधाव वेगाने तेथून जात होता. त्याला कुर्‍हे यांनी थांबविले त्यावेळी त्याच्या कारला काळ्या फिल्मींग लावलेल्या दिसल्या. त्यामुळे त्यांनी त्याला त्याबाबत कायदेशीर इ-चलन भरण्यास सांगितले. त्यावेळी त्याला चलन करण्यास सांगितल्याचा राग आल्याने तो कुर्‍हे यांच्यावर हात उगारून मारण्यासाठी धावून गेला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत वरिष्ठांनाही तुम्हाला काय करायचे आहे ते करा अशी धमकी दिली. यानंतर आकाश गागडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास कोथरुड पोलिस करत आहेत.