पुढील आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही व्यापारी अथवा नोकरदार आहेत तर हि बातमी लक्षपूर्वक वाचा. पुढच्या शनिवार पासून बँक तीन दिवस बंद राहणार असल्याची आपली कामे आपण लवकरात लवकर आपली बँकेतील कामे करून घ्या. शनिवारी दिनांक १२ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत बँकांना सुट्टी असणार आहे. कारण १२ जानेवारी रोजी दुसरा शनिवार ,१३ जानेवारीला रविवार तर १४ जानेवारीला मकर संक्राती निमित्त बँक बंद राहणार आहे.

सलग तीन दिवस बँका बंद असल्याने आपणाला मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नव्य वर्षाच्या पहिल्या महिन्यातच असा प्रसंग आल्याने याला सतर्कतेचे घेण्याची आवश्यकता आहे. आपणाला आर्थिक पेच येऊ नये म्हणून आपण नेट बँकिंग आणि  भीम ॲप याच्या साहाय्याने व्यवहार करून आपण आर्थिक चणचण दूर ठेवू शकता. म्हणून आर्थिक पेचा पासून दूर राहण्यासाठी आपण १२ ते १४ तारखेची बँक सुट्टी विसरू नका.

काय आहे भीम ॲप
भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी  हे मोबाईल ॲप आहे. “नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया”  या संस्थेने या ॲपची निर्मिती केली असून या ॲपची देखभाल हि याच संस्थेकडे देण्यात आली आहे.

भारताचे थोर अर्थशास्त्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावातील भीम हे नाव घेऊन त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून केला आहे. ॲप ॲन्ड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालीवर हे ॲप उपलब्ध असून  आत्ता पर्यत १ कोटी ४५ लाख लोकांनी हे ॲप लोकांनी आपल्या फोन मध्ये डाउनलोड केले आहे. ४० हुन अधिक बँकांचे व्यवहार या ॲपच्या माध्यमातून करण्यात येतात. या ॲपच्या माध्यमातून नेट बँकिंगचा व्यवहार सुलभ झाला आहे.

बँकांच्या सुट्ट्यांना तर आपण रोखू शकत नाही. परंतु नेट बँकिंग ,भीम ॲप , गुगल पे यामाध्यमातून आपण खिशातून नोटा देण्यापेक्षा स्मार्ट पैसे देऊन बँकांच्या सुट्टीच्या काळात आपल्या आर्थिक गरज भागवू शकतो.