सोलापूरमध्ये 14 नवीन ‘कोरोना’चे रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या 470 वर

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 470 वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (बुधवार) एकूण 219 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 205 निगेटिव्ह आले तर 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 7 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 33 झाली आहे.

आतापार्यंत एकूण 5005 स्वॅब चाचणी झाली असून 4871 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 470 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप 174 अहवाल प्रतिक्षेत आहेत. एकूण मृतांची संख्या 33 झाली असून त्यामध्ये 20 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 175 झाली असून सध्या 262 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 137 पुरुष आणि 125 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 13 पैकी 11 पोलीस कोरोना मुक्त झाले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाधिक वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, जप्त केलेल्या 6015 गाड्या योग्य तो दंड भरून घेऊन टप्प्याटप्प्याने सोडण्याची प्रक्रिया सुरू करणार. याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल.
सोलापूर शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी तसेच कोरोना बांधितांवर उपचाराकरिता पूर्व भागातील मार्कंडेय रुग्णालय अधिग्रहण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.