खळबळजनक ! जगातील सर्वात ‘विध्वंसक’ पाणबुडीवर नौसैनिकांना ‘कोकेन’ घेताना रंगेहात पकडले

लंडन : वृत्तसंस्था – अण्वस्त्रांनी भरलेल्या ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या जगातील सर्वात विध्वंसक पाणबुडीवरील नौसैनिकांना कोकेन या अंमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा बंदरानजीक पाणबुडीवरील नौसेनिकांची गोपनीय कारवाई वेळी चाचणी केली तेव्हा त्यांनी कोकेन घेतल्याचे लक्षात आल्यावर त्यांना तातडीने पाणबुडीवरून उतरवून पाणबुडी स्कॉटलँडच्या तळावर नेण्यात आली आहे.

एचएणएण वेनजेंस या पाणबुडीवर नौसैनिक मोठ्या प्रमाणावर कोकेन सेवन करत आहेत. मात्र त्यांना पकडता आले नाही. त्यांना कुणकुण लागल्याने त्यांनी रक्तातून कोकेनचे अंश काढून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी पिऊन टेस्टमधून बचावले. मात्र हे तिघेजण सापडले.

अशी विध्वंसक आहे पाणबुडी

१२ हजार किलोमीटरवर मारा करणारी मिसाईल या पाणबुडीवर बसविण्यात आली आहे. या पाणबुडीवर १६ हून अधिक अण्वस्त्रे तैनात आहेत. या पाणबुडीवर अणूबॉम्बपेक्षा १० पट संहारक ट्रायडेंट मिसाईलही तैनात आहे.

ट्रायडेंट मिसाईलची संहारकता हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अण्वस्त्रांपेक्षा १० पट आहे. ३ वर्षांपुर्वी या मिसाईलची चाचणी घेण्यात आली. ही मिसाईल २१ किमी प्रतितास वेगाने हल्ला करते.