कुलगाम सेक्टरमध्ये तीन दहशतवादी ठार

श्रीनगर : वृत्तसंस्था 

जम्मू काश्मीरमधी कुलगाम सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

[amazon_link asins=’B0144JI572,B07G6RTTP1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e66485e4-b897-11e8-8c86-4fc54078ee7e’]

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या परिसरातील गस्त आणखी वाढविण्यात आली आहे. कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती शुक्रवारी रात्री उशिरा लष्कराला मिळाली. त्यानंतर त्यांनी सर्च मोहिम हाती घेतली. त्यात लपलेल्या दहशवाद्यांचे ठिकाण शोधण्यात यश आले. त्यांना चारही बाजूने घेरण्यात आले. आज पहाटे सुरु झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.

ओडिशातून तब्बल दोन हजार किलो गांजाची तस्करी

काजीगुंड भागात एक दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सध्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. चकमकीनंतर बारामुल्ला-काजीगुंड भागातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली असून जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.