Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधून (Bollywood) एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) आपली अ‍ॅक्शन आणि अभिनयाच्या जोरदार एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टायगर त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटांमध्ये भरपूर अ‍ॅक्शन मसाला ठेवतो, ज्यासाठी त्याला खूप मेहनतही घ्यावी लागते. नुकताच टायगरने (Tiger Shroff)त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील एक अ‍ॅक्शन स्टंट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत झाली आहे.

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत टायगर श्रॉफने लिहिले की, ‘काँक्रीट वॉश बेसिन (Concrete Wash Basin) तोडताना माझा पाय मोडला. मला वाटले की मी ते करेन आणि मी अधिक जोर लावला. पण माझ्या बचावात बेसिनही तुटले’. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की टायगर एका माणसासोबत जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. तो माणूस स्वत:चा बचाव करण्यासाठी समोर वॉश बेसिन आणतो आणि टायगर त्याला तोडतो. मात्र यामुळे टायगरच्या पायालाही दुखापत होते.टायगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘गणपत’ (Ganpat) आणि नंतर अक्षय कुमारसोबत
(Akshay Kumar) ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये (Bade Miyan Chote Miyan) दिसणार आहे.
गणपतमध्ये टायगरसोबत क्रिती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title :- Tiger Shroff | tiger shroff injured during stunt video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा