‘स्पायडर मॅन’ची भूमिका करण्याची टायगर श्र्रॉफची इच्छा, चाहत्यांसोबत ट्विटरवर चॅटिंग करताना केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्टर टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यानं द फ्लाईंग जट्ट सिनेमात सुपरहिरोची भूमिका साकारली होती. परंतु हा सिनेमा खास काही चालला नाही. त्याची भूमिकाही नॉन सीरियस होती. तो अ‍ॅक्चुअल सीरियस सुपरहिरोच्या रोलमध्ये नव्हता. अलीकडेच टायगरनं असा खुलासा केला आहे की, त्याला स्पायडर मॅनचा रोल साकारण्याची इच्छा आहे.

नुकतच ट्विटरवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना टायगरनं याबाबत खुलासा केला. टायगरनं #AskTiger हा हॅशटॅग वापरत चॅट सुरू केलं होतं. यात त्यानं चाहत्यांना त्याच्याशी बोलण्याचा आणि प्रश्न विचारण्यासाठी चान्स दिला. यावेळी एकानं त्याला विचारलं की, तुला एखाद्या मार्वल सुपरहिरोची भूमिका स्क्रीनवर साकारायची आहे का ?

या प्रश्नाल उत्तर देताना मेज्मरायजिंग इमोजी पोस्ट करत लिहिलं की, मला स्पायडर मॅनची भूमिका साकारायची आहे. यावेळी चाहत्यांनी त्याला इतरही अनेक प्रश्न विचारले ज्याची टायगरनं उत्तरं दिली.

टायगर श्रॉफचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 मध्ये दिसला आहे. टायगर हॉलिवूड सिनेमा रैम्बोच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. टायगर 2014 साली आलेल्या हिरोपंती या सिनेमाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच हिरोपंती 2 मध्येदेखील काम करताना दिसणार आहे.