TikTok चं नवीन म्युझिक App Resso भारतात लॉन्च, ‘हे’ आहेत फीचर्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tik Tok ने आपली पॅरेंट कंपनी Bytedance ने भारतात एक म्यूझिक स्ट्रीमिंग अ‍ॅप Resso लॉन्च केले आहे. Bytedance चीनची कंपनी आहे आणि टिकटॉकमुळे जगभरात ही कंपनी प्रसिद्ध झाली आहे. Tik Tok अ‍ॅपमध्ये यश मिळाल्यानंतर कंपनीने भारतात एक नवे अ‍ॅप आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गाना, जिओ, सावन, यूट्यूब म्यूझिक, अ‍ॅपल म्यूझिक आणि स्पॉटिफाय सारखे अ‍ॅप भारतात प्रसिद्ध आहे.

Resso म्यूझिक स्ट्रीमिंग अ‍ॅपचा विचार केला तर यात सर्वप्रकारचे गाणे आहेत परंतु कंपनीने यात सोशल मीडियाचे काही फीचर्स जोडले आहेत. यात एक Vibes नावाचे फीचर देखील आहे.

Vibes फीचरअंतर्गत इमेज किंवा शॉर्ट व्हिडिओ क्लिप्स मिळेल. ज्याच्या बॅकग्राऊंडला ट्रॅक असेल. Lyrics ला कोट करुन यूजर्स ते थेट फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्स अ‍ॅपवर शेअर करु शकतात.

गाण्याचे लिरिक्स स्क्रीनवर दिसतील जे तुम्ही सिलेक्ट करुन शेअर करु शकतात. या अ‍ॅपचे यूजर्स इंटरफेसला सोपे केले आहे. येथे अनेक वेगवेगळे सेग्मेंट आहेत, जेथून तुम्ही पसंतीचे म्यूझिक निवडू शकतात. इतर अ‍ॅपप्रमाणेच तुम्ही या अ‍ॅपमध्ये गाणे, आर्टिस्ट आणि अल्बम सर्च करुन गाणे ऐकू शकतात.

Resso अ‍ॅपला अ‍ॅण्ड्राइड आणि आयफोनवर फ्री डाऊनलोक करु शकतात. हे सब्सक्राइब करण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला पैसे द्यावे लागतात. अ‍ॅण्ड्राइड यूजर्ससाठी दर महिन्याला 99 रुपये ठेवण्यात आले आहे, तर iOS यूजर्स 119 रुपये देऊन दर महिन्याला सब्सक्राइब करु शकतात.