Tiktoker Noel Robinson | मुंबईच्या डान्सिंग कॉपचा नोएल रॉबिन्सनबरोबर भन्नाट डान्स, ‘गुलाबी शरारा’वर दोघेही थिरकले, व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Tiktoker Noel Robinson | आपल्या नृत्याने भारतीयांची मने जिंकणारे मुंबईतील प्रसिद्ध डान्सिंग कॉप अमोल कांबळे (Dancing Cop Amol Kamble) यांनी जर्मन टिकटॉक सेन्सेशन नोएल रॉबिन्सनसह भन्नाट डान्स केला आहे. व्हिडिओत दोघे इंदर आर्याचे लोकप्रिय उत्तराखंडी गाणे गुलाबी शरारा वर जबरदस्त थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओला तब्बल ४.५ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या डान्समुळे आता डान्सिंग कॉप अमोल कांबळे हे जगभरातील लोकांचे मने जिंकत आहेत.(Tiktoker Noel Robinson)

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या या दोघांचा अफलातून डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कांबळे यांचा जबरदस्त डान्स पाहून रॉबिन्सन याने म्हटले की, जगातील सर्वात कूल पोलिस.

नोएल रॉबिन्सनला इंस्टाग्रामवर १०.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
लोकल ट्रेनपासून ते बाजारपेठांपर्यंत संपूर्ण शहरात त्याच्या उत्स्फूर्तपणे डान्स करण्यासाठी त्याला ओळखले जाते.
नोएल रॉबिन्सन याने आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नोएल आणि डान्सिंग कॉप अमोल कांबळे यांनी मुंबईतील रस्त्यावर हा डान्स केला आहे.
नोएलच्या प्रत्येक डान्स स्टेप कांबळे अचूक करताना दिसत आहेत. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
दोघांचा डान्स पाहून नेटकरी हसत देखील आहेत.

बॉलीवूड स्टार अर्जुन कपूर, नेहा यू, सारा हुसैन आणि वैभव मलिक यांसारख्या सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत
इमोजीसह दोघांचे कौतुक केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)