Tiku Talsania | टिकू तलसानिया लवकरच करणार मराठीत पदार्पण; ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले सर्वांचे लाडके अभिनेते टिकू तलसानिया (Tiku Talsania) यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच टिकू तलसानिया (Tiku Talsania) हे ‘झोलमॉल’ या मराठी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुबेर यांनी केले असून नागपूर मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती हरीश कुमार वाली यांच्या नागपूरच्या पद्मा फिल्म प्रोडक्शनची पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटाचे लेखन राज काझी यांनी केले आहे. तर संवाद विनायक पुरुषोत्तम कदम यांनी लिहिले आहे.

 

झोलमॉल या चित्रपटात मोठी स्टारकास्ट टीम आढळून येणार आहे. यामध्ये टिकू तलसानिया यांच्याबरोबर अभिनेते भरत जाधव, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे तर अभिनेत्री प्रार्थना बेहरे, हेमांगी कवी, स्मिता गोंदकर, अश्विनी कुलकर्णी झळकणार आहेत. या चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट अतिशय गमतीशीर कथेवर आधारित असणार त्यात काही शंका नाही. या चित्रपटाचे छायांकन बी लक्ष्मण यांनी केले आहे. तर कास्टिंग डायरेक्टर आणि वेशभूषाकार म्हणून चैत्राली डोंगरे यांनी काम पाहिले आहे.

 

टिकू तलसानिया (Tiku Talsania) यांना आजवर अनेक हिंदी सिनेमा आणि नाटकांमध्ये पाहिले आहे.
तर आता त्यांना मराठी चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
झोलमॉल या चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाने चार चाँद लागणार यात काही वाद नाही.

 

Web Title :- Tiku Talsania | bollywood actor tiku talsania will entre in marathi movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Neha Mahajan | नेहा महाजनच्या ट्रेडिशनल लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Rashami Desai | रश्मी देसाईच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…