Time Magazine Top 100 influential list | टाइम मॅगझीन लिस्ट ! जगातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये PM मोदी, CM ममता बॅनर्जी, ‘सीरम’चे CEO अदर पूनावाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Time Magazine Top 100 influential list | अमेरिकन मॅगझीन टाइम (Time Magazine) ने 2021 मध्ये जगातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये (Top 100 influential list) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना स्थान दिले आहे. टाइमची ही यादी 6 श्रेणीमध्ये विभागली आहे, यामध्ये पायोनियर, आर्टिस्ट, लीडर, आयकॉन, टायटन आणि इनोव्हेटर यांचा समावेश केला आहे. प्रत्येक श्रेणीत जगभरातील लोकांचा समावेश केला आहे.

 

टाइम मॅगझीनची ही यादी जगभरात खुप विश्वासार्ह मानली जाते. या यादीत प्रत्येक एंट्री एडिटर्सद्वारे अतिशय रिसर्चनंतर घेतली जाते. बुधवारी जारी झालेल्या टाइमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत तालिबानचा सहसंस्थापक अब्दुल गनी बरादरचा सुद्धा समावेश आहे.
याशिवाय यादीत जो बायडन, कमला हॅरिस, शी जिनपिंग आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आहे.

 

मागील वर्षीसुद्धा मोदींचे होते नाव

मागील वर्षीसुद्धा टाइमने जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान दिले होते. मागील वर्षी यादीत भारतीय अभिनेता आयुष्मान खुराना, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई,
एचआयव्हीवर रिसर्च करणारे रविंद्र गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनात सहभागी बिल्किस यांचे सुद्धा नाव होते.

 

लेखात टाइम मॅगझीनने केले होते कौतुक

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘नरेंद्र मोदी फॉर पीएम’ अभियान भारतात चालवणारे भाजपा समर्थक
मनोज लडवा यांनी 2020 मध्ये टाइम मॅग्झीनमध्ये नरेंद्र मोदी यांचे कौतूक करणारा लेख लिहिला होता. यात म्हटले होते,
‘मोदी हॅज युनायटेड इंडिया लाईक नो प्राईम मिनिस्टर इन डेकेड्स.’
म्हणजे, मोदी यांनी भारताला अशाप्रकारे एकजुट केले आहे जेवढे दशकात कोणत्याही पंतप्रधानाने केले नाही.

Web Title : Time Magazine Top 100 influential list | pm modi mamata banerjee adar poonawalla in time magazine 100 most influential people of 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update