Tips for Beautiful Nails | पिवळ्या नखांवर करा 5 मिनटात घरगुती उपाय आणि मिळवा सुंदर चमकदार पांढरे नख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tips for Beautiful Nails | सुंदर, स्वच्छ, पॉलिश केलेल्या नखांची नेहमीच प्रशंसा केली जाते. तुमची सुंदरता वाढवण्यात नखांचा मोलाचा वाटा आहे. नखांची काळजी (Nail care) घेणे हे त्वचेची (skin care) काळजी घेण्याइतकेच महत्त्वाचे आहे. नखांची काळजी घेतली नाही तर ते पिवळे पडतात (Yellowing of Nails) आणि निरुपयोगी दिसू लागतात. काही वेळा नेलपॉलिश किंवा इतर सौंदर्य उत्पादने लावल्यामुळेही नखे पिवळी होऊ शकतात. पण, काही घरगुती उपायांनी नखांचा पिवळसरपणा दूर करून त्यांची चमक परत आणता येते. (Tips for Beautiful Nails)

चला जाणून घेऊया की नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय आहेत ?

 

बेकिंग सोडा
एका भांड्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण कापसाच्या मदतीने नखांवर घासून घ्या, जसे की तुम्ही नेल पेंट काढत आहात. हे द्रावण नखांवर सुमारे 5 मिनिटे सोडा आणि कोरडे होऊ द्या. द्रावण सुकल्यानंतर ओल्या ब्रशने नखांवर घासून घ्या. शेवटी, आपले नखे कोमट पाण्याने धुवा आणि कोरडे करा आणि मॉइश्चरायझर लावा. (Tips for Beautiful Nails)

 

पांढरे व्हिनेगर (White vinegar)
पांढरी आणि चमकदार नखं (Shiny Nails) मिळवण्यासाठी व्हाईट व्हिनेगरचा वापर करा . यासाठी एका कपमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात १ चमचा पांढरा व्हिनेगर मिसळा. नंतर त्यात ५ मिनिटे नखे बुडवून ठेवा. त्यानंतर नखे स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे नखांचा पिवळसरपणा दूर होईल.

लिंबू आणि शैम्पू
नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी एका मोठ्या बादलीत कोमट पाणी घ्या. या पाण्यात लिंबाचा रस आणि घरात असलेला शाम्पू टाकून त्या पाण्यात हात आणि पायांची नखे बुडवा. थोड्या वेळाने नखे बाहेर काढून नेल ब्रशने स्वच्छ करा. यामुळे पांढरी आणि चमकदार (White and beautiful Nails) नखे मिळण्यास मदत होईल.

 

ट्री टी तेल (tree tea oil) आणि लिंबू
एक चमचा भर ट्री टी तेल आणि खोबरेल तेलाचे चांगले मिश्रण बनवा आणि नखांवर लावा. थोडा वेळ तेलाला नखांवर तसच राहूद्या. काही मिनिटांनंतर लिंबाची फोड नखांवर घासा. लिंबू नखांवरील पिवळेपणा कमी करेल आणि ट्री टी तेल नखांची सुंदरता वाढेल. (Nail care Tips)

 

हायड्रोजन पेरॉक्साइड (hydrogen peroxide)
एका कप मधे गरम पाणी घ्या त्यात एक चमचा भर हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा. त्या कप मधे 5-10 मिनट नखे बुडवून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून वाळवा. हायड्रोजन पेरॉक्साईड एक उत्तम ब्लिचिंग एजंट आहे. योग्य प्रमाणात वापरल्यास नक्कीच तुम्हा अपेक्षित परिणाम दिसतील.

 

व्हिटॅमिन ई
आहारात व्हिटॅमिन ई (Vitamin E) पुरेशा प्रमाणात समाविष्ट करा.
व्हिटॅमिन ई फक्त नाखांसाठी नाहीतर तुमच्या केसांसाठी, त्वचेसाठी उत्तम पोषक आहे.
नखांना जर सुंदर बनवायचे असेल तर आहारात व्हिटॅमिन ई चा समावेश करा.

 

Web Title :- Tips for Beautiful Nails | home remedy to remove yellowness from nails know how to get white and glowing nails

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Burn Belly Fat | मलायका अरोराने पोटाची चरबी घालवण्यासाठी सांगितले रामबाण उपाय, वजन सुद्धा होईल कमी; जाणून घ्या

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 50 रुपयांची बचत तुम्हाला रिटर्नमध्ये देईल 35 लाख रुपये; समजून घ्या गणित

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सुरक्षित योजना ! बँकेपेक्षाही देते जास्त परतावा, जाणून घ्या