Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड Aadhaar card प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वापरले जाते. प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड Aadhaar card अनिवार्य आहे. त्यामुळे आधार कार्ड सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच UIDAI ने आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा दिली आहे. अशा प्रकारे आपण आपल्या आधार कार्डचा डेटा सुरक्षित ठेवण्यास सक्षम असाल आणि कोणतीही व्यक्ती ती अनलॉक करु शकणार नाही. यामुळे तुमच्या आधार कार्डची माहिती सुरक्षित राहील आणि धोका टळेल. आधार कार्ड कसे लॉक Lock करायचे जाणून घ्या…

आधार कार्ड Aadhaar card प्रत्येक कामाच्या ठिकाणी उपयुक्त आहे. आपल्या बँकेत खाते उघडायचे असेल किंवा मुलांना शाळेत प्रवेश घेयचा असेल, सिमकार्ड खरेदी, अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड गजरचे आहे. बहुतांश सरकारी योजनांमध्ये आधार कार्ड महत्त्वाचे आहे. आधार कार्ड नसेल तर शासकिय योजनांचा फायदा घेता येत नाही. आधार भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये तुमच्या हाताच्या बोटांचे ठसे आणि इतर संवेदनशील माहिती असते. सध्याच्या काळात डेटा चोरी करणारे खूप सामान्य झाले आहेत. अशा परिस्थितीत जर तुमचा आधार डेटा चोरीला गेला तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.

मात्र, आता घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण UIDAI मध्ये सर्व कार्ड लॉक करण्याची सुविधा आहे. अद्याप अनेक जणांना या सुविधेची माहिती नाही. आधार लॉक केल्यास आधार कार्डशी संबंधित बनावट बनवण्यास बंदी घातली जाऊ शकते. हे वैशिष्ट्य लॉकसारखे कार्य करते आणि इतर कोणतीही व्यक्ती ते अनलॉक करु शकत नाही. जाणून घ्या आधार कार्ड लॉक करण्याची पद्धत.

आधार कार्ड कसे लॉक करायचे
– आधार कार्ड लॉक करण्यासाठी प्रथम तुमच्या फोनमधील मेसेज ॲप ओपन करा.
– यानंतर GETOTP टाईप करून 1947 या क्रमांकावर मेसेज पाठवा. आपल्या फोन नंबरवर एक OTP येईल.
– जेव्हा ओटीपी तुमच्या फोनवर येईल तेव्हा तुम्हाला पुन्हा LOCKUID आणि आधार क्रमांक लिहून 1947 वर SMS पाठवावा लागेल.
– असे केल्याने आपले आधार कार्ड लॉक होईल.

आधार कार्ड अनलॉक कसे करायचे
– आधार कार्ड अनलॉक करण्यासाठी प्रथम तुमच्या फोनमधील मेसेज अॅप ओपन करा.
– यानंतर आपल्या रजिस्टर क्रमांकावरुन GETOTP व आधार क्रमांक लिहून 1947 या क्रमांकावर मेसेज पाठवा. आपल्या फोन नंबरवर एक OTP येईल.
– 6 अंकी ओटीपी क्रमांक UNLOCKUID आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर आणि ओटीपी टाईप केल्यानंतर1947 वर एसएमएस पाठवावा लागेल. असे केल्याने आपले आधार कार्ड अनलॉक होईल.

आधार कार्ड लॉक झाल्यानंतर, हॅकर्स आपल्या परवानगीशिवाय आधार सत्यापित करु शकत नाहीत. आता आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. दिलेल्या पद्धतीने तुमचे आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करु शकता.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय