Titan Submersible Debris | टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या 5 अब्जाधीशांचे मृतदेह सापडले

नवी दिल्ली : Titan Submersible Debris | टायटॅनिक जहाजाचे (Titan Submersible Debris) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन सबमर्सिबल या पाणबुडीचा स्फोट होऊन त्यामधील पाच प्रवाशांचा मृत्यू (Five Passengers Died) झाला होता. टायटॅनिक जहाजाचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील पाच अब्जाधीशांचे मृतदेह (Dead Body) सापडले आहेत, याबाबत माहिती समोर आली आहे.

अटलांटिक महासागरात (Atlantic Ocean) या पाणबुडीचा स्फोट (Submarine Explosion) झाला. समुद्राच्या खोलात उतरून अपघातग्रस्त पर्यटक पाणबुडी टायटनचे अवशेष (Titan Submersible Debris) किनाऱ्यावर आणले जात आहेत. पाणबुडीचे अवशेष बुधवारी कॅनडातील सेंट जॉन्स येथील बंदरात होरायझन आर्क्टिक जहाजातून (Horizon Arctic Ship) उतरवण्यात आले.

अमेरिकन तटरक्षक दलाच्या (US Coast Guard) माहितीनुसार, मानवी अवशेष अमेरिकेत परत आणण्यात आले. टायटन सबमर्सिबलचे अवशेष बुधवारी पुन्हा किनाऱ्यावर आणण्यात आले. 18 जून रोजी टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखवणारी पर्यटक पाणबुडी टायटन मध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात जहाजावरील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तटरक्षक दलाला अब्जाधीशांचे मृतदेह सापडले. मृतदेह आणि जहाजाचे अवशेष किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र मृतदेहांची ओळख पटवणेही अडचणीचे ठरत आहे.

टायटन पाणबुडीचे अवशेष पाण्याखाली सुमारे 12 हजार 500 फूट खोलवर होते. हे समुद्राच्या तळावरील टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांपासून सुमारे 1 हजार 600 फूट दूर होते. यूएस कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार की, उत्तर अटलांटिक महासागरात 18 जून रोजी झालेल्या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी अमेरिका (America), कॅनडा (Canada), फ्रान्स (France) आणि ब्रिटन (Britain) एकत्र काम करत आहेत.

अशी घडली घटना…

18 जूनला टायटन या पर्यटक पाणबुडीतून 5 अब्जाधीश अटलांटिक महासागरात टायटॅनिक अपघातग्रस्त जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेले होते. पण ही पाणबुडी पाण्यात उतरल्यानंतर अवघ्या काही तासांतच बेपत्ता झाली. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडाच्या नौदलाकडून या पाणबुडीचा शोध सुरु होता. 22 जूनला तटरक्षक दलाला बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले यावरून पाणबुडीचा स्फोट झाल्याची चर्चा आहे.

Web Title : Titan Submersible Debris | us coast guard said they found human remains in titan submersible incident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा