#Video : पश्‍चिम बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागु होणार, पुन्हा हिंसाचार उफाळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतरही पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापत आहे. भाजपने काढलेल्या रॅलीत हिंसाचार झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.या हिंसाचारात राज्यात गेल्या चोवीस तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे.

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता. त्यानंतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. जमावबंदी लागू असतानाही ममता सरकार विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या कांड्या, पाण्याचे फवारे यांचा वापर केला जात आहे .

तीन दिवसांपूर्वी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसने रॅली काढली होती. त्यावेळी भाजप व तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात चार भाजप कार्यकर्त्यांचा तर एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.