शाडू मातीच्या मूर्तीच आणाव्यात : महापौर टिळक

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने शाडूच्या गणेशमूर्तीच आणाव्यात असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे.
[amazon_link asins=’B0073C7IIK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dda47d27-aead-11e8-b960-9b27f455f3c3′]

महापालिकेच्या देखावे पारितोषिक वितरण महापौरांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, अवयवदानासारख्या चळवळीचा प्रसारही माध्यमातून झाला पाहिजे. निवासासाठी देशातील एक क्रमांकाचे शहर असा दर्जा पुणे शहराला मिळाला आहे. तो टिकविण्याची जबाबदारी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आहे. याप्रसंगी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक सचिन दोडके, आनंद रिठे, सुशील मेंगडे, आदित्य माळवे आदी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e280b0ce-aead-11e8-9db4-cf0aa5ed799c’]

२०१५ चे प्रथम पारितोषिक धनकवडीच्या आदर्श मित्रमंडळाला, २०१६ चे प्रथम पारितोषिक बुधवार पेठेतील साईनाथ मित्रमंडळाला आणि २०१७ चे प्रथम पारितोषिक शनिपार मित्रमंडळाला देण्यात आले. सोसायटी विभागाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सेनापती बापट रस्त्यावरील सुयोगनगर को-ऑपरेटिव्ह सोसायटीला देण्यात आले.

जाहिरात

दि.13 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधित 28 लाख 50 हजाराची व्हीव्हरशिप मिळवलेल्या व 15 हजार Subscribes असलेल्या Policenama News या चॅनेला Subscribe करा.

Policenama News