1 जून राशिफळ : ‘या’ 7 राशींवाल्यांसाठी आजचा दिवस चांगला, ‘शुभवार्ता’ समजण्याची दाट शक्यता

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस सामान्य आहे. मानसिकदृष्ट्या कमजोरी जाणवेल. आरोग्य त्रास देऊ शकते. असंतुलित खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. अन्नाची काळजी घ्या. कामात यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात जोडीदार तुमच्या लाभाचा मार्ग खुला करेल. नात्यात आनंद राहील. परदेशातून लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ
आजचा दिवस खूप चांगला आहे. मानसिकदृष्ट्या आनंदी रहाल. आव्हानांना आनंदाने तोंड द्याल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीबरोबर रोमान्सची संधी मिळेल. विवाहितांचे जीवन सामान्य राहील. कामात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. परिश्रमाचे फळ मिळत नसल्याची भावना होईल. आरोग्य चांगले राहील

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाला वेळ द्याल. त्यांच्या गरजा समजून घ्याल. यामुळे, कुटुंबातील सदस्यांच्या दृष्टीने तुमचे स्थान मजबूत होईल. विरोधकांवरही वर्चस्व गाजवाल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यवसायाठी दिवस सामान्य आहे. सासरच्या लोकांशी बोलाल. भाग्य कमजोर असल्याने कठोर मेहनत करावी लागेल. कामात स्थिती सामान्य असेल. आरोग्य नरम राहील.

कर्क
आजचा दिवस उत्तम आहे. सुविधांचा वापर कराल. काही गुप्त कामांवर पैसे खर्च कराल. विरोधकांकडून कोणतीही समस्या होणार नाही, तरीही चिंता आवश्य राहील. विवाहितांसाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागेल. प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून रागावू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता.

सिंह
आजचा दिवस उत्तम आहे. थांबलेली कामे मार्गी लागतील. कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. प्रेमसंबंधात समस्या कमी होतील. अभ्यासात अडचणी येतील. विरोधकांना मागे टाकाल. आरोग्य चांगले राहील

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. मानसिक तणावातून आराम मिळेल. अभ्यासामध्ये लक्ष लागेल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील. रोमान्स वाढेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. कामात बरीच मेहनत घेतल्यानंतर चांगले परिणाम मिळतील. घरात खर्च होईल.

तुळ
आजचा दिवस सामान्य आहे. मानसिक ताण टाळण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करा. प्रवासासाठी दिवस चांगला नाही. घरातील वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. कामात यश मिळेल. कौटुबिंक जीवनात अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीसोबत अनेक विषय बोलल्याने मन हलके होईल.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होतील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. तब्येत बिघडू शकते. वर्तणूक चांगली ठेवा. जोडीदारास काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रागामुळे अस्वस्थ होऊ शकता. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. कामाकडे पूर्ण लक्ष दिल्याने चांगले परिणाम मिळतील. खर्च वाढेल. उत्पन्न सामान्य राहील. आर्थिक भार वाढेल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करतील. कौटुंबिक जीवनात काळजी घ्या. जोडीदाराचा राग वाढू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

मकर
आजचा दिवस सामान्य आहे. चांगल्या व्यक्तीला भेटून किंवा फोनवर बोलल्याने आनंद होईल. व्यवसायात फायदा होईल. कामात चांगले परिणाम मिळतील. आनंदी व्हाल. घरगुती जीवनात आनंदी राहील. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य चांगले राहील. इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करू शकता.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. आव्हानांचा सामना करावा लागेल. कोणत्याही दबावाखाली येणार नाही. मानसिक तणावातून आराम मिळेल. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. कौटुंबिक जीवन प्रेममय राहील. भविष्याबद्दल जोडीदाराबरोबर चर्चा कराल. सहलीची योजना आखू शकता. प्रेमसंबंधासाठी खूप आनंददायी काळ आहे. कामात अधिक परिश्रम करावे लागतील.

मीन
आजचा दिवस चांगला राहील. कामात जास्त बुद्धी वापरावी लागेल आणि मेहनत करावी लागेल. अन्यथा समस्या उद्भवू शकतात. नशिबाच्या भरोशावर बसू नका. परिश्रम घ्या. उत्पन्न सामान्य राहील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like