Coronavirus : फुफ्फुसंच नव्हे, शरीराच्या ‘या’ अवयवांवर सुद्धा हल्ला करतोय ‘कोरोना’, प्रसिद्ध एक्सपर्टचा इशारा

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना संसर्गाचे आकडे वाढत चालले आहेत. या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये अनेक प्रकारच्या समस्या आढळल्या आहेत. ई-कॉन्क्लेव्हमध्ये अमेरिकेच्या प्रसिद्ध वायरोलॉजिस्टने सांगितले की, कोविड-19 फुफ्फुसांशिवाय शरीराच्या अनेक अवयवांवर वाईट परिणाम करत आहे.

एक्सपर्टने सांगितले की, कोरोना व्हायरस शरीरच्या श्वसन तंत्राशिवाय अनेक भागावर वाईट परिणाम करत आहे. हा लिव्हर, किडनी आणि हार्टसह शरीराच्या अनेक अवयवांचे नुकसान करत आहे. यासाठी हे जरूरी आहे की, लोकांनी केवळ किती मृत्यू होत आहेत, याच गोष्टीकडे लक्ष न देता, हे सुद्धा पहावे की, किती लोक वाईट पद्धतीने प्रभावित होत आहेत.

वायरोलॉजिस्टने सांगितले की, हे सांगणे अवघड आहे की, भविष्यात संसर्ग होणार्‍या लोकांमध्ये याची लक्षणे दिसतील किंवा नाही. हा व्हायरस लवकर आपले जेनेटिक रूप बदलत नाही. त्याला असे करण्यात अडचण असते. हा व्हायरस कोणतीही चूक करत नाही.

कोरोनाच्या रूग्णांमध्ये जास्त ताप, श्वास घेण्यास त्रास, सूखा खोकला, सर्दी, अंगदुखी अशी अनेक लक्षणे दिसतात. मात्र काही लोकांमध्ये आजाराची लक्षणे खुप उशीरा दिसतात, यामुळे तो जास्त धोकादायक बनतो.