7 August Rashifal : या पाच राशीवाल्यांसाठी आठवड्याचा पहिला दिवस शुभ, वाचा दैनिक भविष्य

नवी दिल्ली :  ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.

मेष (Aries Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवसायात गुंतून राहाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून निराशाजनक माहिती ऐकू येईल. घरात नातेवाईक आल्याने खर्च वाढेल. उत्पन्नाची चिंता असेल. परंतु कुटुंबातील सदस्यांना काही सांगू शकणार नाही. वाद सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

दिवस संमिश्र आहे. व्यावसायात जास्त धावपळ करावी लागेल. ज्यामुळे थकवा जाणवेल. स्पर्धा क्षेत्रात तुम्ही लोकांसोबत मिळून एखादे काम वेळेपूर्वी पूर्ण कराल. आई-वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

मिथुन (Gemini Daily Horoscope)
दिवस सामान्य आहे. कार्यक्षेत्रात मनासारखे काम न मिळाल्याने थोडे अस्वस्थ रहाल. थकवा आणि व्यस्ततेमुळे कामावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. राजकारणात विरोधकांच्या बोलण्याला बळी पडू नका. निर्णय क्षमता वाढवावी लागेल. कुटुंबातील कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर ते मोठ्या प्रमाणात परत करू शकता.

कर्क (Cancer Daily Horoscope)
दिवस खास आहे. जुनी आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यात बराच वेळ घालवाल. व्यवसायात मोठी माहिती लीक होऊ देऊ नका. अनोळखी व्यक्तीवर बारीक लक्ष ठेवा, अन्यथा तो फसवणूक करू शकतो. नवीन वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. आनंदी व्हाल. जुन्या चुकांमधून धडा घ्या, अन्यथा नंतर पश्चाताप होईल.

सिंह (Leo Daily Horoscope)

दिवस संभ्रमाचा आहे. कोणते काम करावे आणि कोणते नाही हे समजणार नाही. कुटुंबातील एखाद्याशी भेट होईल. सरकारी योजनेत पैसे गुंतवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेच्या प्रकरणात कोर्टात हजर राहावे लागेल. मोठी रक्कम अनोळखी व्यक्तीसोबत योजनेत गुंतवू नका. मालमत्तेशी संबंधित काही बाबींमध्ये विजय मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.

कन्या (Virgo Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबात शुभकार्य आयोजित केल्याने आनंद होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायात रखडलेले काम पूर्ण होईल. एखाद्याने दिलेल्या सल्ल्यावर खुपच काळजीपूर्वक वाटचाल करावी लागेल. कुटुंबातील लोक बोलण्याला पूर्ण आदर करतील. विद्यार्थी परीक्षेतील समस्यांबद्दल शिक्षकांशी बोलू शकतात.

तूळ (Libra Daily Horoscope)
दिवस मेहनतीचा आहे. एखादे काम करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होईल. कामात जबाबदारीही वाढू शकते. कामाचा ताण वाढेल. व्यवसायाशी संबंधित योजना एकत्रित येऊन कराव्या लागतील. भागीदारीत काम करण्यासाठी हो म्हणू नये, अन्यथा फसवणूक होऊ शकते. जुन्या चुकीमुळे चिंतेत असाल.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

दिवस तणावात राहण्याचा आहे. काम बिघडू शकते, त्यामुळे कामात नुकसान सहन करावे लागेल. संततीने परीक्षा दिली असेल तर निकाल येऊ शकतो. जोडीदारासोबतचे मतभेद वाढू शकतात. त्यांच्याशी बोलणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये विरोधक त्रास देतील.

धनु (Sagittarius Daily Horoscope)
दिवस कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा आहे. अन्यथा निराशा वाटू शकते. शारीरिक त्रास होत असेल तर वेदनाही वाढतील. व्यावसायासाठी दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. कोणाकडूनही वाहन मागून चालवू नये, अन्यथा अडचण येऊ शकते. नातेवाईकांकडून काही निराशाजनक माहिती ऐकायला मिळेल.
एखाद्या योजनेत पैसे गुंतवले असतील तर चांगला नफा मिळेल.

मकर (Capricorn Daily Horoscope)
दिवस अभ्यास आणि अध्यात्मातच्या  सहभागी होऊन नाव कमावण्याचा आहे.
मन भगवंताच्या भक्तीत गुंतेल. आनंदी व्हाल. कायदेशीर प्रकरणात विजय मिळेल.
वादविवादापासून दूर राहा, तरच सन्मान मिळेल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
व्यवसायात घाईघाईत निर्णय घेऊ नका. एखादी योजना केली तर भविष्यात चांगला नफा मिळेल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आज प्रवासाला जाण्यापूर्वी काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या.
तब्येतीची काळजी दूर होईल. व्यवसायात नुकसान सहन करावे लागत असेल तर सावधगिरी बाळगा.
अन्यथा अडचणी येऊ शकतात. संतती अपेक्षा पूर्ण करेल.
विद्याथ्र्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल.
वादग्रस्त परिस्थितीपासून दूर राहावे. व्यर्थ भांडणात उतरल्यास नुकसान होईल, सावध राहा.

मीन (Pisces Daily Horoscope)
दिवस लाभदायक आहे. कार्यक्षेत्रातील योजनांचा फायदा होईल.
नवीन काम सुरू केल्यास चांगला फायदा होईल. कुटुंबातील सदस्याचे लग्न पक्के होईल.
घरी शुभकार्य आयोजित केला जाईल. नातेवाईकाच्या बोलण्यात येऊन निर्णय घेऊ नका.
कुटुंबातील एखाद्या समस्येमुळे काळजीत असाल तर, तिकडे दुर्लक्ष करू नका, बाहेच्या व्यक्तीला सांगू नका.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maha Arogya Camp In Pune | महाआरोग्य शिबिराचा समारोप !
गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा – देवेंद्र फडणवीस