Today Horoscope | 02 July Rashifal : सिंह आणि तुळ राशीवाल्यांना धनलाभ, तर धनु आणि कुंभ राशीच्या जातकांचा होईल कायदेशीर विजय

नवी दिल्ली : Today Horoscope | ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली (Daily Horoscope) आपल्याला सांगते की, या दिवशी ग्रह-तारे अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, ते जाणून घेवूयात (Dainik Rashifal).

 

मेष (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. मन इतर कामात व्यस्त असेल, त्यामुळे स्वतःचे काम थांबू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही वचन दिले असेल तर ते पूर्ण करावे लागेल. प्रेमविवाहाची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांची मान्यता मिळू शकते. आज संततीच्या अभ्यासातील समस्यांबद्दल शिक्षकांशी बोलावे लागेल. सरकारी योजनेत पैसे गुंतवू शकता.

 

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आज कुटुंबातील वातावरण चांगले राहील. इच्छा पूर्ण झाल्याने आनंदी व्हाल. सामाजिक क्षेत्रात प्रतिमा आणखी सुधारेल. एखादे काम त्रासदायक ठरू शकते. जुनी चूक आज उघड होऊ शकते. न मागता कोणाला सल्ला दिला तर पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. घराच्या नूतनीकरणावर पैसे खर्च कराल. सुरू असलेली कौटुंबिक समस्या दूर होईल.

 

मिथुन (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस खास आहे. क्षेत्रातील विरोधक वर्चस्व गाजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. जवळच्या लोकांचा आणि प्रियजनांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एखाद्याला पैसे दिले असतील तर ते परत मिळू शकतील. कुटुंबातील लोक बोलण्याचा मान राखतील. एखादे नवीन काम सुरू केले तर चांगला फायदा होऊ शकतो. विद्याथ्र्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा अडचण येऊ शकते.

 

कर्क (Cancer Daily Horoscope)

आज नोकरी बदल करू शकता, परंतु कोणताही निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या. सुखसोयींच्या काही वस्तूंच्या खरेदीवर खूप पैसे खर्च कराल. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होईल, तिला मनातील एखादी गोष्ट सांगू शकता. विदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. कल धार्मिक कार्याकडे असेल. पैशातील काही भाग परोपकारात खर्च कराल.

 

सिंह (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस धावपळीचा आहे. कौटुंबिक एखाद्या सदस्याच्या तब्येतीची काळजी वाटेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटाल. वरिष्ठांशी बोलताना वाणी गोड ठेवा, अन्यथा अडचण येऊ शकते. एखाद्याला पैसे दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मनातील एखादी गोष्ट जोडीदारासोबत शेअर करू शकता.

 

कन्या (Virgo Daily Horoscope)

आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. पैशाशी संबंधित बाबींमध्ये खूप मदत मिळेल. एखादे नवीन काम सुरू करू शकता. कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिकला जाण्याचा बेत कराल. सासरच्या मंडळींकडून पैसे उधार घेणे टाळा, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. जुन्या मित्रासोबत एखाद्या सरकारी योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करा. विद्याथ्र्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

 

तूळ (Libra Daily Horoscope)

आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. कुटुंबात एखादे शुकार्य आयोजित केले जाऊ शकतो, ज्यामध्ये नातेवाईक येतील. व्यवसायात काही समस्या असतील तर अनुभवातून फायदा होईल. एखादा जुना सौदा बराच काळ अडकला असेल तर तो आज पूर्ण होऊ शकतो. जोडीदाराकडून खूप सहकार्य मिळेल. एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. एखाद्या कायदेशीर प्रकरणात विजय होईल.

 

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला आहे. कोणत्याही वादविवादापासून दूर राहावे. एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते. आज संततीच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा ते काही चुकीच्या संगतीकडे जाऊ शकतात. तब्येतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. एखादे रखडलेले काम पूर्ण करू शकाल. व्यवसायाची कामे उद्यावर टाकणे टाळा, अन्यथा समस्या येऊ शकते.

 

धनु (Sagittarius Daily Horoscope)

आज एखाद्या कायदेशीर प्रकरणात विजय मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहात काही अडथळे असतील तर ते आज मित्राच्या मदतीने दूर होतील. स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामावर जास्त लक्ष द्याल, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. प्रवासात वाहन जपून चालवा, अन्यथा अपघात होऊ शकतो. एखादी महत्वाची माहिती मिळेल. पैशाच्या व्यवहाराशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याशी बोलू शकतो. जे घरापासून दूर नोकरी करत आहेत त्यांना कुटुंबातील सदस्यांची उणीव भासू शकते.

 

मकर (Capricorn Daily Horoscope)

आजचा दिवस काही विशेष करून दाखवण्याचा आहे. क्षेत्रात एखादी मोठी संधी मिळाल्याने मन आनंदी राहील. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद झाले असतील तर ते दूर होतील. वडिलांच्या तब्येतीच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे टाळा.
राजकीय क्षेत्रात मनासारखी लाभ मिळू शकतो. एखादे मोठे पद मिळू शकते.
मात्र डोळे-कान उघडे ठेवून काम करा, अन्यथा अडचण येऊ शकते.

 

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस तणावाचा आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.
परंतु आपल्या काही गोष्टी गुप्त ठेवा. काहीतरी नवीन करण्यात व्यस्त राहाल.
जर एखाद्या नातेवाईकाच्या सल्ल्याने निर्णय घेतला असेल तर नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.
एखादा मित्र घरी मेजवानीसाठी येऊ शकतो.

 

मीन (Pisces Daily Horoscope)

पैशाशी संबंधित बाबी करता आजचा दिवस थोडा कमजोर आहे.
बोलण्यामुळे कामाच्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतो.
कोणत्याही गोष्टीवरून जास्त रागावू नका, अन्यथा प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते.
इतरांच्या कामाची काळजी वाटेल. जर नवीन काम सुरू करायचे असेल तर ते थोडे काळजीपूर्वक करा.
काही खास कामासाठी एखाद्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. मातेशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

 

 

Web Title :  Today Horoscope | Daily Rashi Bhavishya 02 july 2023 know today horoscope
daily horoscope prediction for libra virgo aries in marathi

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा