22 July Rashifal : कुंभ राशीवाल्यांसाठी तणावाचा दिवस, जाणून घ्या अन्य राशींची स्थिती

नवी दिल्ली :  ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली आपल्याला सांगते की, या दिवशी ग्रह-तारे अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, ते जाणून घेवूयात (Dainik Rashifal).

मेष (Aries Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र आहे. महत्त्वाच्या कामात दिरंगाई करू नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. महत्त्वाच्या माहिती पटकन कुणाला सांगू नका. जबाबदाऱ्या वेळेवर पार पाडा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. आज जास्त कामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.

वृषभ (Taurus Daily Horoscope)
आजचा दिवस अचानक लाभाचा आहे. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळाल्याने आनंद होईल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल. वैद्यकीय सल्ला घ्या. कार्यक्षेत्रात काम वेळेपूर्वी पूर्ण केल्याने सन्मान होईल. विद्यार्थी बौद्धिक आणि मानसिक आजारातून मुक्त होताना दिसत आहे. मालमत्तेशी संबंधित वाद सुटेल.

मिथुन (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस चांगला आहे. राजकीय क्षेत्रात मोठे पद मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा प्रतिमा डागाळू शकते. पैशाचे व्यवहार अत्यंत सावधगिरीने करा. अन्यथा समस्या येऊ शकते.

कर्क (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस तणावपूर्ण आहे. तणावामुळे कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. व्यवसायात योग्य वेळी निर्णय घ्या. प्रवासात सावधगिरी बाळगा. नवीन वाहन घरी आणू शकता. संपत्तीशी संबंधित वादातून सुटका होईल. निर्णय तुमच्या बाजूने होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला घरापासून दूर नोकरी मिळाल्यामुळे बाहेर जावे लागेल.

सिंह (Leo Daily Horoscope)
दिवस कामात काहीतरी नवीन करण्याचा आहे. दैनंदिन जीवनात योग्य व्यायामाचा अवलंब करावा लागेल, तरच समस्यांपासून मुक्त व्हाल. मोठा व्यवहार करू नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कर्ज फेडाल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. अविवाहित लोकांसाठी उत्तम विवाहाचे प्रस्ताव येतील. रोजगाराच्या शोधात असाल तर चांगली बातमी मिळेल.

कन्या (Virgo Daily Horoscope)

दिवस आनंदाचा आहे. व्यवसायातील जोखीम टाळा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. नोकरीत मेहनतीला फळ येईल. चांगला फायदा मिळेल. कुटुंबातील सदस्यासोबत वादाची परिस्थिती उद्भवल्यास शांत राहा. संतती अपेक्षा पूर्ण करेल.

तूळ (Libra Daily Horoscope)
दिवस भागीदारीत काम करण्याचा आहे. कुटुंबात शुभ कार्यक्रम आयोजित कराल. आवडती वस्तू हरवली असेल तर ती पुन्हा मिळेल. जोडीदारासोबत मनमानी करण्याच्या सवयीमुळे अडचणीत येऊ शकता. मित्रासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. काही निरर्थक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. मन कामात गुंतून राहणार नाही. न मागता सल्ला देणे टाळा. अन्यथा समस्या येऊ शकते. घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करू शकता. जवळच्या व्यक्तीकडून निराशाजनक माहिती ऐकायला मिळू शकते. जोडीदाराच्या करिअरबद्दल चिंतेत रहाल.

धनु (Sagittarius Daily Horoscope)

आजचा दिवस अडचणी आहे. गाडी चालवताना निष्काळजीपणा केल्यास अपघाताची भीती आहे.
कौटुंबिक जीवनात परस्पर मतभेदांमुळे त्रस्त व्हाल. घरगुती जीवनातील समस्या दूर होतील.
शेअर मार्केटमध्ये खूप काळजीपूर्वक गुंतवणूक करा. जुन्या चुकीबद्दल पश्चाताप होईल.

मकर (Capricorn Daily Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस कोर्टाशी संबंधित विषयात चांगला आहे. जुना वाद संपुष्टात येईल.
शासन व प्रशासनाच्या कामात गती ठेवा. कार्यक्षेत्रात सदस्याशी वाद घालू नका, अन्यथा चूक होऊ शकते.
सरकारी योजनेत पैसे गुंतवणे चांगले राहील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल.
खूप दिवसांनी मित्राला भेटायला जाऊ शकता.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)
आजचा दिवस तणावपूर्ण आहे. मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त राहील. कुटुंबातील एखादा सदस्य सत्य सांगेल.
अपमान सहन करावा लागला तरी कोणाला बोलणार नाही.
आईकडील लोकांशी समेट करण्यासाठी आईला घेऊन जाल.
शारीरिक वेदना होत असतील तर वेदना वाढू शकतात.

मीन (Pisces Daily Horoscope)

आजचा दिवस काही खास करण्याचा आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्याशी वाद घालू नका.
नवीन गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करा. अन्यथा चूक होऊ शकते.
कुटुंबातील सदस्याची तब्येत अचानक बिघडल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
वाहन चालवताना काळजी घ्या. विद्याथ्र्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर